LEOPARD ATTACK IN JUNNAR OTUR GIRL INJURED DURING MORNING WALK Saam Tv
मुंबई/पुणे

Leopard Attack : जुन्नरच्या लेकीचं धाडस, बिबट्याच्या जबड्यातून धाकट्या बहि‍णीला वाचवले, भल्या पहाटे पुण्यात थरार

Pune Junnar Leopard Attack News : पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन बहिणींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून बहिणीच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Alisha Khedekar

  • ओतूरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान बिबट्याचा हल्ला

  • तरुणी गंभीर जखमी

  • बहिणीच्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला

  • परिसरात भीतीचे वातावरण, वनविभागाकडे कारवाईची मागणी

रोहिदास गाडगे, पुणे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीजवळ वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असतानाच आता लहान मुलांवर हल्ल्यांच्या घटना समोर येऊ लागल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनत आहे. अशाच एका धक्कादायक घटनेने ओतूर परिसर हादरून गेला आहे.

ओतूर येथील वाकचौरे वस्ती परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन बहिणींवर बिबट्याने अचानक हल्ला केला. काव्या वाकचौरे आणि कल्याणी वाकचौरे या दोघी सकाळच्या वेळी परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने काव्यावर झडप घातली. या अचानक झालेल्या हल्ल्यात काव्या गंभीर जखमी झाली असून तिच्या पाठीवर, पोटावर आणि मांडीवर खोल जखमा झाल्या आहेत.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, या प्रसंगी काव्याची बहीण कल्याणी हिने धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत मोठ्याने आरडाओरडा केला. तिच्या आवाजामुळे बिबट्या घाबरून पळून गेला आणि मोठा अनर्थ टळला. कल्याणीच्या तत्परतेमुळे काव्याचा जीव वाचल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.

घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी काव्याला ओतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पालकांमध्येही चिंतेची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील मानवी वस्तीजवळ बिबट्यांचा वाढता वावर ही गंभीर बाब ठरत आहे. वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Risk : झोपेची कमतरता, ताण आणि मांसाहारामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ICMR चा धक्कादायक अहवाल समोर

Maharashtra News Live Update: शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार

Health Tips : भटक्या कुत्रा चावला? वेळ वाया घालवू नका; हे उपाय तातडीने करा

Crime: २ पत्नी असल्याचं कळालं, बॉयफ्रेंडने प्रग्नेंट गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर मृतदेह दुसऱ्या राज्यात नेऊन पूरला

Currency note serial number: नोटांवरचा सिरीयल नंबर नेमका काय सांगतो? जाणून घ्या रहस्य

SCROLL FOR NEXT