पुणे: पुण्यात (Pune) २५ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना आरटीआय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. या आरटीआय कार्यकर्त्याने अगोदर २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ही खंडणी दंडात्मक कारवार्इ टाळण्यासाठी मागितली असल्याचे समोर आले आहे.एका बांधकाम ठेकेदाराकडे त्याने ही खंडणी मागितली होती.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी परवानगी घेतली का अशी विचारणा करत कोर्टात कारवाई होऊ द्यायची नसेल तर २ कोटी रुपये द्या अशी बतावणी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय फाळके असे आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी भरती विद्यापीठ पोलीस (Police) ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जामखेड तालुका, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे उत्खणाचे काम सुरू आहे. याबद्दल सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत का, असे फाळके वारंवार विचारणा करत होता, आणि दंडात्मक कारवाई नको असेल तर २ कोटी रुपये द्या अशी मागणी करत होता. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून फाळके याला अटक केली आहे.
फाळकेच्या त्रासाला कंटाळून ठेकेदाराने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर सापळा लावला. ठेकेदाराने खंडणीचा पहिला हप्ता घेण्यासाठी फाळकेला कदम प्लाझा इमारतीजवळ बोलावले होते. त्यावेळी ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी घेताना फाळकेला पकडण्यात आले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.