Manasvi Choudhary
काकडी कोशिंबीर, रायता किंवा सॅलड म्हणून आहारात खाल्ली जाते. आज आपण काकडीचे स्पेशल धिरडे ही रेसिपी सांगणार आहोत.
काकडीचे धिरडे बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच उन्हाळ्यात खास नाश्त्याला पौष्टिक काकडीचे धिरडे बनवू शकता.
सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात काकडी बारीक किसून घ्या नंतर त्यात हिरवी मिरचीकोथिंबीर, ओवा, हळद, तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
नंतर या मिश्रणात तांदळाचे पीठ, बेसन आणि ज्वारीचे पीठ थोडे थोडे करून टाका. काकडीमध्ये पीठ भिजेल इतकेच पीठ तयार करा.
गॅसवर तव्यावर गरम तेलामध्ये हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने पसरवून घ्या. मिश्रण पातळ पसरवल्यामुळे धिरडे कुरकुरीत होतील.
धिरडे शिजताना कडेने थोडे तेल टाका. खालची बाजू कुरकुरीत झाली की धिरडे उलटवा आणि दुसरी बाजूही चांगली भाजून घ्या. मध्यम आचेवर दोन्ही बाजून धिरडे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.