Pune Marketyard Hotel Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Fire News: पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव, मार्केटमधील हॉटेलला भीषण आग; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

Pune Marketyard Hotel Fire News: मार्केटयार्ड येथील एका हॉटेलला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Marketyard Hotel Fire News: पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून एक भयानक घटना समोर आली आहे. मार्केटयार्ड येथील एका हॉटेलला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले असून यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. (Latest Marathi News)

आगीची माहिती मिळताच पोलिसांसह (Police) अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.

मुन्ना राठोड आणि संदीप अशी मृत कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (Pune News) शहरातील मार्केटयार्ड परिसरातील रेवण हॉटेल आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास या हॉटेलला अचानक आग लागली.

क्षणार्धात आगीने रौद्ररुप (Fire Accident) धारण केलं. या आगीत हॉटेलमध्ये असलेले तीन कामगार होरपळले. यातीन दोन कामगारांचा मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांसह अग्निशम दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी झालेल्या कामगाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात आठवड्यात २ हत्या; एकीकडे चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, दुसरीकडे पुतण्याने काकाला संपवलं

Maratha Fort History: किल्ल्यावरील माची आणि बालेकिल्ला यांच्यातील नेमका फरक काय?

Beed Accident: मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

Vipreet Rajyog 2026: शुक्राच्या गोचरमुळे तयार होणार विपरीत राजयोग; 14 मे पर्यंत या राशींवर बरसणार पैसा

Mumbai News: ICU मध्ये बेड नाही, स्ट्रेचरवरच उपचार; कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT