Latur News
Latur NewsSAAM TV

Latur News: हॉटेलच्या खिडकीत बसून व्हॉलीबॉल मॅच पाहणं जीवावर बेतलं, खाली पडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

Girl died after falling from window of hotel: हॉटेलच्या खिडकीत बसून शेजारच्या जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेली व्हॉलीबॉल मॅच पाहत बसली होती.
Published on

>>संदीप भोसले, साम टीव्ही

Latur Latest News : लातूरमध्ये 11 वर्षीय लहान मुलीचा खिडकीतून तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलगी विजेच्या तारेवर पडली आणि यातच तीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

आद्या देशपांडे असे या मुलीचं नाव आहे. ती मुळची हैदराबाद येथील रहिवाशी आहे. लातूरमध्ये ती एका कार्यक्रमासाठी तिच्या मावशीसोबत आली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मावशी आणी ती दोघी बुकिंग असलेल्या हॉटेलवर येऊन आराम करत होत्या. मात्र आद्या हॉटेलच्या खिडकीत बसून शेजारच्या जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेली व्हॉलीबॉल मॅच पाहत बसली होती.

Latur News
Anand Mahindra Tweet: नदीखालून रस्ता जाणार? आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ ट्वीट करून थेट नितीन गडकरींना विचारला सवाल

दरम्यान अचानक खिडकी उघडली आणि आद्याचा तोल गेला. आद्या ही दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. खिडकीच्या खालीच विजेची तार आहे. आद्या खिडकीतून पडली तेव्हा ती आधी या विजेच्या तारेवर पडली आणि नंतर जमिनीवर आदळली. (Breaking News)

Latur News
प्रसिद्ध कोरियन अभिनेत्री Park Soo-Ryun चं अपघातात निधन, चाहत्यांना मोठा धक्का

या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. आद्याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र तिची परिस्थिती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र या घटनेत आद्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com