Bharati Vidyapeeth Police Pune SAAM TV
मुंबई/पुणे

Koyta Gang : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा राडा, तरूणाला गाठलं अन्....

Pune Crime News : कात्रज भागातील आंबेगाव परिसरात कोयता गँगने दहशत माजवली. पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन जाधव

Pune Koyta Gang : कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी कठोर कारवाईचे धोरण अवलंबले असले तरी, त्यांची दहशत काही केल्या कमी झाली नसल्याचे चित्र आहे. कात्रज भागातील आंबेगाव परिसरात कोयता गँगने दहशत माजवली. पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पुण्यातील (Pune) कात्रज भागातील आंबेगाव परिसरात कोयता गँगने (Koyta Gang) दहशत माजवल्याची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून या टोळीने एका तरुणावर कोयत्याने वार केले. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. (Crime News)

कोयता गँगच्या हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. या प्रकरणी तुषार माने (वय २०), चंद्रकांत माने (वय २०), किरण भंडारी (वय २०, सर्व रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी तरूणाने भारती विद्यापीठ पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पाच महिन्यांपूर्वी आरोपी तुषार माने याच्याशी तरुणाचा वाद झाला होता. तरूण घरासमोर थांबला होता. त्यावेळी आरोपी तुषार, त्याचे साथीदार तुषार, किरण तेथे आले. माझ्याकडे काय बघतोस, अशी विचारणा करून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली.

फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी चंद्रकात मानेने शुभमवर कोयत्याने वार करून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध भारती विद्यापीठ पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रूग्णालयातून पळून घरी आला, दुसऱ्या दिवशी रेल्वे रूळावर तरूणाचा मृतदेह आढळला; सांगलीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: नागपुरात मुसळधार पाऊस, सखल भागांत पाणी साचलं

Education Department: शिक्षण विभागाचा बोगस कारभार, बनावट कागदपत्रांद्वारे रिक्त पदावर नियुक्ती

भगव्या शालीवरून कोकणात वाद पेटला; नितेश राणे विरुद्ध उदय सामंत|VIDEO

CBSE Class 10 Exam Pattern Change : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, प्रमुख विषयांच्या परीक्षेत महत्वाचे बदल, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT