Pune Koyta Gang Video x
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा हैदोस! टपरी चालकावर जीवघेणा हल्ला, दुकानांची तोडफोड; Video

Pune Crime News : पुण्याच्या कोंढवा परिसरात काल (२० जुलै) कोयता गँगने धुडगूस घातल्याचे पाहायला मिळाले. तरुणांनी एका टपरीमालकाला मारहाण करत त्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला.

Yash Shirke

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Koyta Gang : पुण्यातून कोयता गँगकडून तोडफोड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोंढव्यामध्ये कोयता गँगने हैदोस घातला. गँगमधील तरुणांनी कोंढवा परिसरातील एका टपरी चालकावर हल्ला केला. टपरीचीही तोडफोड केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री (२० जुलै) पुण्याच्या कोंढवा परिसरात कोयता गँगने एका टपरी चालकावर हल्ला करत त्याच्या दुकानाची तोडफोड केली. गँगमधील तरुणांनी दुकानातील गल्ल्यात हात घालून पैसे काढण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. कोयता गँगकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टपरीच्या चालकावरील हल्ल्यापूर्वी शितल पेट्रोल पंपाजवळील चार ते पाच दुकानांवरही अशाच पद्धतीने हल्ले करण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात अद्याप पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भवानी पेठेत कोयता गँगची दहशत

पुण्यातील भवानी पेठ परिसरात कोयताधारी तरुणांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. किरकोळ भांडणावरून काही युवकांनी हातांमध्ये कोयते आणि तलवारी घेत जवळपास दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली. आम्हीच इथले भाई, आमच्या नादाला लागू नका असे म्हणत तरुणांनी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आयुष्याला वेगळं वळण मिळणार; 'या' राशींच्या लोकांना फायदा होणार, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Shiv Puja Niyam: शंकराच्या मंदिरातून परत येताना 'या' चुका करणं टाळा; पुजेचं फळ मिळणार नाही

Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

SCROLL FOR NEXT