Pune Kidney Racket Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Kidney Racket: किडनी रॅकेट प्रकरणात मोठी कारवाई, ससूनचा माजी वैद्यकीय अधीक्षक ताब्यात

Ajay Taware: पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात ससूनचा माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

किडनी रॅकेट प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. आज अज तावरेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरेचा सहभाग असल्याने समोर आल्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजय तावरेला या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कोल्हापूरमधील एका महिलेला कथितपणे १५ लाख रुपयांचे आमिष दाखवण्यात आले होते. तिने एका प्रत्यारोपणाची गरज असलेल्या पुरुषाची पत्नी असल्याचे खोटे भासवले आणि एका तरुण महिला रुग्णाला आपली किडनी दान केली. त्याच्या बदल्यात त्या तरुण महिलेच्या आईने त्या पुरुषाला किडनी दान केली होते.

२९ मार्च २०२२ रोजी, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार दिवसांनी, संबंधित महिलेने पैशांवरून झालेल्या वादानंतर आपली खरी ओळख उघड केली. त्यामुळे रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी ही घटना आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली.

तावरे याची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका आहे. तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. डॉ. तावरे हा तेव्हा रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्याने बनावट कागदपत्रांना मान्यता दिली असल्याचे नमूद करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT