Khadakwasla Dam Water
Khadakwasla Dam Water Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Khadakwasla Dam: पुणेकरांसमोर पाणीसंकट? खडकवासला धरण साखळीच्या पाणीसाठ्यात घट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Khadakwasla Dam Water Storage Managment

पुणेकरांसमोर मोठं पाणीसंकट उभं राहत आहे. खडकवासला धरण (Khadakwasla Dam Water) साखळीच्या पाणीसाठ्यात घट झाल्याचं समोर येतंय. मागली वर्षी फेब्रुवारी महिन्यात खडकवासला धरण साखळीमध्ये आजच्या दिवशी २०.२६ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. आज तो १७.२९ टीएमसी एवढाच शिल्लक आहे. त्यामुळं पुढील पाच महिन्यांचं काटेकोर नियोजन पाटबंधारे विभागासह पालिकेला करावं लागणार आहे.   (Latest Marathi News)

कालवा समितीची या महिन्यात बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीमध्ये पुणे (Pune) शहराच्या पाणीपुरवठ्याचं भवितव्य ठरणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं पुणे शहरात पाण्याची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत काही अंशी बिकट आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

धरणातील पाणीसाठ्याचं नियोजन आवश्‍यक

तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित या पार्श्वभूमीवर कालवा समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला गेला होता. त्यानंतर आता मार्च महिन्यात कालवा समितीची बैठक पार पडणार आहे. त्या वेळी धरणातील उपलब्ध पाणीसाठा, बाष्पीभवन, पिण्यासाठी लागणारे पाणी यांचा आढावा घेतला (Khadakwasla Dam Water Storage) जाईल. पुढील चार महिन्यांच्या पाणी वापराचं नियोजन करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं.

पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी शेतीला देण्याची सूचनाही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. मागील काही महिन्यांपासून धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. मागील वर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी झाला आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन धरणातील (Khadakwasla Dam Water Issue) पाणीसाठ्याचं नियोजन करणं आवश्‍यक आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातच कालवा समितीची बैठक घेण्यात येणार आहे, असं खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्‍वेता कुऱ्हाडे यांनी सांगितलं आहे.

शहरातील पाण्याची वाढती मागणी

पुणे महापालिका हद्दीत २०१७ आणि २०२१ मध्ये नव्यानं ३४ गावे समाविष्ट झाली आहेत. दरवर्षी वाढणारी लोकसंख्येमुळे आता शहराला २०.३४ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या १० वर्षांत पुणे शहराची पाण्याची गरज सहा टीएमसीने वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक देखील तयार केलं होतं. त्यात जलसंपदा विभागाकडून मिळणारा पाण्याचा कोटा २०.२७ टीएमसी करण्याची मागणी देखील केली होती. मात्र, अद्याप जलसंपदा विभागाकडून त्याला मान्यता (Khadakwasla Dam Water Managment) देण्यात आलेली नाही. शहरातील पाण्याची वाढती मागणी आणि धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन कालवा समितीच्या बैठकीत काय निर्णय होईल, यावर आता शहराच्या पाण्याचं भवितव्य ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Voting Live : पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर; सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Rahul Gandhi: द्वेषाच्या राजकारणाला देश कंटाळलाय..., भाजपवर निशाणा साधत राहुल गांधींनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन

Mumbai News: कांदिवलीतील फ्लॅटमध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चपाती ऐवजी 'या' पोळ्या खा; झटपट बारीक व्हाल

Yoga For Asthma: दम्यावर रामबाण उपाय सापडला;विरासन केल्याने घेता येईल मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT