Dhule News : पाणी टंचाईचे संकट; धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५० टक्केच पाणीसाठा

Dhule News : पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकलेला नाही. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे.
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : धुळे जिल्हा तीव्र पाणी संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून जिल्ह्यात एकूण ५७ मध्यम (Dhule) व लघु प्रकल्पातील मिळून केवळ ५०.९७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही वेगाने घट होत (Water Crisis) असल्याने येत्या काळात पाण्याचे दुर्भीक्ष्य अधिकच जाणवणार आहे.  (Latest Marathi News)

Dhule News
Jalgaon Political News: खडसेंनी आता उभे राहून एकदा निवडून दाखवावं; गिरीश महाजन यांचा निशाणा

धुळे जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर यंदा कोरड्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ धुळेकरांवर आली आहे. पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस (Rain) झाल्याने मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकलेला नाही. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule News
Hingoli News : कापसाची स्वस्त दरात करावी लागतेय विक्री; हिंगोलीत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांची अडचण

गतवर्षीपेक्षा २५ टक्के कमी साठा 

पाटबंधारे विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या जिल्हयातील ५७ मध्यम आणि आकडेवारीनुसार लघु प्रकल्पात केवळ ५०.९७ टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत धुळे जिल्हयातील प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या देखील चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com