Pune dam water level saam tv
मुंबई/पुणे

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

Pune dam water level : पुण्यात पावसाळा सुरू असतानाही खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. टेमघर धरण पूर्णपणे कोरडे पडले असून पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

Akshay Badve

Pune dam water level latest update today : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणांमध्ये पाण्याची टंचाई आहे. गेल्या २ दिवसांपासून पुण्यात रिमझिम पाऊस पडतोय असं असलं तरीसुद्धा यंदा उशिरा दाखल झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा अर्ध्यापेक्षा खाली झालाय. पुण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणाऱ्या खडकवासला धरण अवघे १५ टक्के भरले आहे तर जिल्ह्यातील टेमघर धरणात तर शून्य टक्के पाणी आहे. पाहूया पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे..

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे असं असलं तरी सुद्धा धरण पाणलोट क्षेत्रात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही परिणामी पाणी साठ्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चार महत्त्वाची धरण आहेत ज्यामध्ये खडकवासला, वरसगाव, टेमघर आणि पानशेत यांचा समावेश होतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या चारही धरणांमधून मिळून 42 टक्के कमी पाणीसाठा असल्याची नोंद करण्यात आलाय.

जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही प्रमुख धरणांमध्ये यंदा पाण्याची तीव्र टंचाई आहे. दोन दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे खडकवासला धरणातून पाणी साठ्यात अवघ्या एक ते दोन टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या या धरणात 15 टक्के पाणीसाठा आहे. पानशेत मध्ये 18 टक्के तर वरसगाव मध्ये 13 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वात गंभीर परिस्थिती टेमघर धरणाची आहे. या धरणात यंदा आजच्या तारखेला शून्य पाणीसाठा आहे. ही परिस्थिती यंदा पहिल्यांदाच नाही. गेल्या १० वर्षांत २०१६, २०१९, २०२२ आणि २०२६ अशा चार वेळा टेमघर धरण कोरडे पडले आहे. २०२५ मध्येही फक्त ३७.९५ टक्के साठा होता.

२०१६ हे वर्ष सर्वात भीषण दुष्काळाचे होते. तेव्हा टेमघर शून्य, पानशेत ८.१० टक्के आणि पवना १०.१२ टक्के वर होते. यंदा २०२६ मध्येही टेमघरने पुन्हा 'शून्य' गाठले असून, एकूणच साठा २०१६ च्या जवळपास पोहोचला आहे. चार धरणांचा एकत्रित उपयुक्त साठा फक्त १३ टक्के आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये हा साठा ५६ टक्के होता. म्हणजे एका वर्षात तब्बल ४७ टक्के घट झाली झालीय. पावसाळा सुरू होऊनही धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सामाजिक वनीकरण विभागातील कथित घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पावसाळ्यात त्वचेवर खाज आणि पुरळ येतात? ताबडतोब करा 5 घरगुती उपाय

Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

Kidney Cancer: किडनी कॅन्सरची सुरुवात अनेकदा या 1 लक्षणाने होते; 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT