Pune Crime Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भाऊच झाला वैरी! भावाची निर्घृण हत्या केली, अन् मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला

Pune murder case : पुण्यात जुन्या वादातून चुलत भावाने भावाची निर्घृण हत्या करून मृतदेह पोत्यात भरून कात्रज गुजरवाडी येथे टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

  • कात्रज गुजरवाडी परिसरात पोत्यात बांधलेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

  • मृत व्यक्तीचे नाव अजय पंडित तर आरोपीचे नाव अशोक पंडित असून दोघेही चुलत भाऊ आहेत.

  • जुन्या कौटुंबिक वादातून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

  • आरोपीला पिंपरी चिंचवड येथून ताब्यात घेत असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune murder case where cousin killed brother over family dispute : पुण्यामध्ये भावानेच भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे. चुलत भावाने भावाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरला अन् फेकून दिल्याचा प्रकार कात्रज गुजरवाडीमध्ये समोर आला आहे. जुन्या वादातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.

येथील गुजर निंबाळकरवाडीत पोत्यामध्ये बांधलेला मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खून करून पोत्यात बांधून मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांचीही झोप उडाली होती. अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अशोक पंडित असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली.

अशोक पंडित याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता. मृत पावलेला तरुण आणि आरोपी दोघेही चुलत भाऊ असून झारखंड येथील राहणारे आहेत. अंतर्गत वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पुणे पोलिसांची शहरात धडक कारवाई

गेल्या तीन आठवड्यात पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात कारवाई करत 11 पेक्षा जास्त पिस्तुल जप्त केल्या आहेत. पुण्यातील काळेपडळ,कोंढवा आणि इतर ठिकाणी छापेमारी करत पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले. पुणे शहरात अजूनही अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अनेक ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांचा तपास करत आहे. शहरात खून,मारामारी याचे प्रकार वाढले त्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Oberoi: 'कोण शाहरुख खान...? त्याला सगळे विसरतील'; किंग खानबद्दल असं का बोलला विवेक ओबेरॉय

Aloo Kachori : आलू कचोरी बनवण्यासाठीच्या या भन्नाट ५ टिप्स, नक्की करा फॉलो

Mumbai Crime: 'ते' फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी, बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

Accident News : ५० मजूरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

SCROLL FOR NEXT