Pune By-Election
Pune By-Election Saam Tv
मुंबई/पुणे

Pune By-Election: महाविकास आघाडीत मतभेद? कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाची उडी

Prachee kulkarni

Pune By-Election News : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र या जागेवरून संघर्ष होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

भाजपकडून (BJP) माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने, माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह गणेश बिडकर आणि शैलेश टिळक यांचे नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात (Pune) जोरदार राजकारण रंगलं आहे.

तर, दुसरीकडे आता कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटाने उडी घेतली आहे. कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (Shivsena) उतरणार आहे. पुण्यात काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत पुणे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. कालच्या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात नेमकं काय होत हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lemon Detergent: लिंबाच्या सालीपासून बनलेलं डिटर्जंट वापरा; भांडी चांदीसारखी चकाकतील

Today's Marathi News Live : Manoj Jarange: नाशिकमध्ये मु्ख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने

Mumbai Lok Sabha: ईशान्य मुंबईत भाजपला मोठा झटका; धार्मिक कार्यक्रमात मिहिर कोटेचा यांना मतदान करण्याचं आवाहन, गुन्हा दाखल

Madhya Pradesh News: घटस्फोटाच्या अर्जानंतर पतीविरोधातील तक्रार सूडाचे कृत्य नाही, हायकोर्टाने केलं स्पष्ट

Side Effects Of Bitter Gourd: कडू कारलं खाल्ल्यानंतर काय खाऊ नये?

SCROLL FOR NEXT