Pune Crime News x
मुंबई/पुणे

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Pune Crime News : पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या धाकट्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Yash Shirke

  • पुण्यातील तरुणाने केली धाकट्या भावाची हत्या

  • व्यसनाच्या सवयीवरुन दोघा भावांमध्ये वाद

  • रागाच्या भरात थोरल्या भावाकडून धाकट्या भावाचा खून

  • पोलिसांनी थोरल्या भावाला केली अटक

Pune : ताम्हिणी घाटामध्ये एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्या प्रकरणात पोलिसांनी मृत तरुणाच्या थोरल्या भावाला अटक केली आहे. थोरल्या भावाने किरकोळ वादातून त्याच्या धाकट्या भावाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी (२६ जुलै) सकाळी ताम्हिणी घाटामध्ये पौड पोलिसांना एका तरुणाचा बेवारस मृतदेह सापडला होता. या तरुणाची ओळख पटली नव्हती. तपासानंतर तरुणाची ओळख पटली. तरुणाच्या थोरल्या भावाने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृत तरुणाच्या भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तरुणाचा थोरला भाऊ हा पुण्यातील कर्वेनगरमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी शोधून आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने धाकट्या भावाची हत्या केल्याचे कबुल केले. आरोपीचे नाव अनिकेत आणि मृत तरुणाचे नाव ऋषिकेश असे आहे. आरोपीने शुल्लक कारणावरुन त्याच्या धाकट्या भावाची हत्या केल्याचे चौकशीतून समोर आले.

नेमकं काय घडलं?

ऋषिकेशला दारुसह अंमली पदार्थांचे व्यसन होते. ऋषिकेश आणि अनिकेत शुक्रवारी (२५ जुलै) कर्वेनगरवरुन दुचाकीने कोकणात जाण्यासाठी निघाले होते. ताम्हिणी घाटातील गोणवडी गावाजवळ मध्यरात्री दोघे भाऊ थांबले. ऋषिकेशला अनिकेतने व्यसन सोडण्यास सांगितले. या व्यसनाच्या मुद्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात अनिकेतने त्याच्या धाकट्या भावाची, ऋषिकेशची हत्या केली. त्यानंतर अनिकेत घाबरुन घटनास्थळाहून पळून गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Real cause of breast pain: स्तनात जाणवणाऱ्या वेदनांचं खरं कारण काय? डॉक्टरांनी सांगितला महिलांसाठी महत्त्वाचा इशारा

Shocking News : डोंबिवलीत हत्येचा थरार! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या, पोलिसांनी काही तासात आवळल्या हल्लेखोरांच्या मुसक्या

Pawna Lake Tourism: बजेट कमी आहे? 'या' ठिकाणी करा ट्रीप, कुल्लू मनाली विसराल

SCROLL FOR NEXT