Junnar Crime News  saam tv
मुंबई/पुणे

Crime News: भयंकर! पती- पत्नीने विहिरीत उडी मारुन संपवले जीवन; धक्कादायक घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ

Junnar Crime News: पती पत्नीने एकाचवेळी आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रोहिदास गाडगे

Pune News: जुन्नर तालुक्यातील पिपंरी पेंढारच्या नवलेवाडी येथे विहिरीत उडी मारुन पती पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. ओतुर पोलिसांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पती पत्नीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.. (Latest Marathi News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की,जुन्नर (Junnar) तालुक्यातील पिपंरी पेंढारच्या नवलेवाडी या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत धनगर समाजातील पती-पत्नीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती पत्नीने एकाचवेळी आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ओतुर पोलीस आणि जुन्नर रेस्क्यु टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून शवच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून ओतूर पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पती पत्नीने दोघांनीही एकाचवेळी असा टोकाचा निर्णय का घेतला, ही आत्महत्या की घातपात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT