jejuri fire Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान लागली आग; राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होरपळले, 14 कार्यकर्ते जखमी

jejuri Shocking news : निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान आग लागल्याची घटना घडली. या घटनेत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक होरपळले. तर १६ कार्यकर्ते भाजले गेले.

Vishal Gangurde

नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर

जेजुरीत विजयाच्या जल्लोषादरम्यान आग लागल्याची घडली घटना

राष्ट्रवादीच्या दोन नगरसेविका होरपळल्या

पुणे : राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. राज्यातील विविध ठिकाणी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. मात्र, जेजुरीत विजयाच्या जल्लोषादरम्यान एक दुर्घटना घडली.

पुण्यातील जेजुरीत विजय जल्लोष मिरवणुकीवेळी आग लागल्याची घटना घडली. या घटनेत विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे आणि घाडगे या नगरसेविका होरपळल्याची माहिती हाती आली आहे.

नेमकं काय घडलं?

जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर नगरसेवक आणि कार्यकर्ते गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घ्यायला गेले. त्यावेळी भंडाऱ्याचा भडका होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत सुमारे १६ जण प्रचंड भाजले. या भाजलेल्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे आणि त्यांचे पती राहुल घाडगे, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत होरपळलेल्या आणि भाजलेल्या जखमींना तातडीने येथील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पोलिसांनीही घटना स्थळी धाव घेतली. आता परिस्थितीची माहिती घेतली आहे. याबाबतचे माहिती अशी की, मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला आणि स्फोटही झाला. यामध्ये सुमारे १६जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.

जखमींची नावे पुढील प्रमाणे

१)रुपाली खोमणे २) निशा दादा भालेराव, ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६) लक्ष्मी माऊली खोमणे ,७) उमेश भंडलकर, ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११) विलास बारभाई १२) मनीषा चव्हाण १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ ) कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६) रजनी बारभाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मतदारांचा घराणेशाहीला सुरुंग; एका घरातले 6 उमेदवार, सहाही पडले

शिंदेसेनेच्या मंडलिकांना मोठा धक्का; दोन्ही राष्ट्रवादीनं राखला कागलचा गड, VIDEO

ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला; कोकणात चालली शिंदेंची जादू, निकाल बदलणार कोकणाचं गणित?

कणकवलीत मंत्री राणेंचा पराभव; भावांच्या भांडणात संदेश पारकर नगराध्यक्ष

Nagar Palika Nagar Parishad Election: स्वबळावर लढले, जागा वाढल्या; उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंचं यश पाचपट

SCROLL FOR NEXT