Pune prohibitory orders from August 18 to August 31 Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! पुण्यात आजपासून जमावबंदी, रील सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई, पाहा काय सुरू अन् काय बंद?

Pune prohibitory orders : पुण्यात १८ ऑगस्टपासून ३१ ऑगस्टपर्यंत १४ दिवस जमावबंदी आदेश लागू आहेत. पाच किंवा अधिक लोकांचे जमाव, विनापरवानगी मिरवणुका, आक्षेपार्ह भाषणे आणि दहशत पसरवणाऱ्या सोशल मीडिया रील्सवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune prohibitory orders from August 18 to August 31 : पुण्यात आज रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट रात्री एक पासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू आहेत. पोलीस आयुक्तांकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, याच काळात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची पुण्यात विद्यार्थ्यांसोबत छात्रो की गुंज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी पोलीस देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ईद-ए-मिलाद नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने कायदा सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्याने जमाबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहेत. या काळात पुणे शहरात राजकीय पक्ष सामाजिक संघटना मोर्चे धरणे निदर्शने बंद व उपोषण सारखे आंदोलन आयोजन करतात विविध कारणामुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो यासाठी जमाबंदी आदेश लागू असल्याचा आदेशात म्हटले आहे. विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१)(२)(३) अन्वये हे आदेश लागू केले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश १८ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्री १२:०१ वाजेपासून ते ३१ ऑगस्ट २०२६ च्या रात्री १२:०० वाजेपर्यंत (एकूण १४ दिवस) लागू राहणार आहेत.

'या' कृत्यांवर घालण्यात आलीय बंदी -

  • शस्त्रे, लाठ्या, तलवारी, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे तसेच दगड किंवा फेकावयाची हत्यारे जमा करण्यास मनाई असेल.

  • कोणत्याही व्यक्तीच्या चित्रांचे, प्रतिमांचे किंवा प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन व दहन करण्यास बंदी राहील.

  • गुन्हेगारांचे व्हिडिओ अथवा रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत पसरवणे किंवा धमकी देणे यावर पूर्ण बंदी असेल.

  • जातीय सलोखा बिघडवणारी भाषणे, अवाच्च घोषणा देणे, गाणी गाणे किंवा वादग्रस्त फलक व चित्रे तयार करून प्रदर्शित करण्यास बंदी असेल.

  • पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे किंवा विनापरवानगी मिरवणूक काढणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

नियम मोडल्यास कारवाईचा इशारा:

शासकीय सेवेतील व्यक्ती आणि ३.५ फुटांपर्यंतची काठी बाळगणारे खाजगी सुरक्षा रक्षक यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मात्र, सामान्य नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार कडक कायदेशीर कारवाई, दंड किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वंदे मातरम्'च्या सन्मानासाठी मी १०० वेळा वेडी व्हायला तयार आहे - चित्रा वाघ

श्रावणात बनवा कांदा- लसूण न वापरलेल्या 5 भाज्या, ज्या आरोग्यासह चवीलाही असतील भारी

डॉक्टरकडे तपासणीसाठी महिला गेली अन् लाखोंची सोनसाखळी गायब; CCTV पाहताच पोलिसांना मिळाला धक्कादायक धागा

SIR 2026 : SIR प्रक्रिया संपली! २४ ऑगस्टला यादीत नाव नसेल तर? अशी करा पुढची प्रक्रिया

Instant Idli Recipe : तांदूळ भिजवण्याची झंझट संपली! फक्त १५-२० मिनिटांत 'या' ट्रिकने बनवा मऊसूत इडली

SCROLL FOR NEXT