Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

पाटबंधारे विभागानं वाढविला पाण्याचा दर; पुणे महापालिकेवर पडणार १२० कोटींचा बाेजा

आता पाण्यासाठी पुणे महापालिकेस माेजावे लागणार २०० कोटी; जाणून घ्या नेमकं कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव

पुणे - शहराच्या मागणीनुसार वाढीव पाणी कोटा अद्याप राज्य शासनाने मंजूर केला नाही. पण पाटबंधारे विभागाकडून पाण्याची पट्टी मात्र वाढवली आहे. त्यामुळे आता महापालिकेला या पाणीपट्टीसाठी वर्षाकाठी ८० कोटी रुपयांऐवजी तब्बल २०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. थोडक्यात काय तर हा १२० कोटी रुपयांनी वाढलेला खर्च पुणेकरांच्या (Pune) करातूनच वसूल केला जाणार आहे.

हे देखील पाहा -

शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव, भामा आसखेड या धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो.पाटबंधारे विभागाने महापालिकेसोबत केलेल्या करारानुसार ११.५० टीएमसी पाणी कोटा शहरासाठी मंजूर केला आहे. त्यासाठी प्रतिवर्षी महापालिकेला ७५ ते ८० कोटी रुपये पाटबंधारे विभागाला द्यावे लागतात. पाटबंधारे विभागाने आता नवे दर लागू केले आहेत.१ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

असा झाला आहे बदल

महापालिकेला पूर्वी घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट जलवाहिनीतून पाणी घेतल्यास प्रति हजार लिटरला ३० पैसे दर होता आणि कालव्यातून पाणी घेतल्यास प्रती हजार लिटरला ५५ पैसे दर होता. आता जलवाहिनीसाठी प्रती हजार लिटरला ५५ पैसे आणि कालव्यातून उचलल्यास प्रति हजार लिटरला १. १० रुपये इतका दर आकारला जाणार आहे.औद्योगिक वापरासाठी थेट धरणातून पाणी उचलणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना प्रति हजार लिटर ४.८० रुपये ऐवजी ११ रुपये द्यावे लागणार आहेत. कच्चा माल उद्योगांना प्रति हजार लिटर १२० रुपये ऐवजी १६५ रुपये द्यावे लागतील.हे सगळे दर जलनियमन प्राधिकरण यांची दरवाढ करते ते चार पाच वर्षातून ठरत असत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

पुण्यात शिंदे सेनेला नव्या भिडूची साथ; फडणवीस - पवार यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, युतीची घोषणा

Blocked heart arteries: शरीरातील हे मोठे बदल सांगतात तुमच्या हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात

BMC Election : भावासोबत युती नाहीच? मनसेने स्वबळावर केली तयारी, मुंबईत १२५ जागांवर लढण्याची शक्यता

Girija Oak-Godbole: असं सौंदर्य पाहून काळजाची धाकधूक वाढली,अभिनेत्री गिरिजाचे फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT