Maval Bridge Collapse x
मुंबई/पुणे

Maval Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, नेमकं काय घडलं?

Maval News : मावळमधील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घ़डली. त्यामुळे पूल कोसळून नागरिकांचा मृत्यू होऊ पर्यंत प्रशासकीय यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न निर्माण झालाय. पूल कसा कोसळला ? दुर्घटना का घडली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मृत्यूच्या दाढेत अडकलेल्याच्या सुटकेचा हा थरार.. ध़डकी भरवणारा आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथील इंद्रायणी नदीचा पूल कोसळला आणि सुट्टीच्या दिवशी पूलावर फिरण्यासाठी आलेले काही लोक वाहून गेले. त्यानंतर NDRF ला काही पर्यटकांला वाचवण्यात यश आलं तर काहींचा मृतदेह दुर्घटनेनंतर नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. दुर्घटनेवेळी इंद्रायणी नदीचा पूलावर नेमकं काय घ़डलं होतं? प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलंय ते पाहूया...

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, नेमकं काय घडलं?

- मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला

- रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते

- काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने पुलाचं वजन वाढलं

- दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता, जास्त वजन सहन करण्यास असमर्थ होता

- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही

हा पूल धोकादायक होता अशी कुठलीही सुचना प्रशासनानं पर्यटकांसाठी फलकाद्वारे दिली नव्हती. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. निधी मंजूर झाल्याची माहिती दिली जातेय. आता भविष्यात नवीन पूल बांधलाही जाईल...मात्र पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? उदासिन असलेली प्रशासन यंत्रणा की अकार्यक्षम नेतृत्व हाच खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT