Pune Traffic Saam tv
मुंबई/पुणे

Pune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल, जड वाहनांना शहरात बंदी; 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

Pune Traffic Update : पावसाळ्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहरात जड आणि मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहे.

Namdeo Kumbhar

Pune Traffic update : शहरात पावसाळ्यात जड वाहने, मालवाहु वाहने अडकण्याच्या किंवा बंद पडण्याच्या घटना घडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ९ जुलै पासून पुढील आदेशापर्यंत जड-अवजड वाहनांस प्रवेश बंदी केली आहे. या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी केडगाव-चौफुला-न्हावरे-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण मार्गे व उरळी कांचन-कोरेगाव मुल –अष्टापुर–तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण मार्गे जावे.

मुंबई येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरे-केडगाव-चौफुला सोलापूर महामार्ग मार्गे व तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-आष्टापूर-कोरेगाव मुल-उरळी कांचन मार्गे तसेच कात्रज मंतरवाडी फाटा-वडकी-दिवेघट-सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव चौफुला मार्गाचा वापर करावा.

मुंबई येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी तळेगाव, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, अहिल्यानगर मार्गाचा वापर करावा. तर अहिल्यानगर येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी शिक्रापूर –चाकण-तळेगाव मार्गाचा वापर करावा.

सासवड येथून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव-सुपे-केडगाव-चौफुला मार्गाचा वापर करावा.

शहरात मालाची चढ-उतार करणाऱ्या वाहनांनी रात्री ११ ते सकाळी ६ वा. पर्यंत खालील मार्गाने ये-जा करावी. अहिल्यानगर कडून पुणे शहरात येणाऱ्या वाहनांनी नगर रोडने वाघोली-खराडी बायपास- शास्त्रीनगर चौक-गोल्फ क्लब चौक-आळंदी रोड जंक्शन-चंद्रमा चौक-पोल्ट्री चौक-हॅरीश ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.

सोलापूरकडून पुणे शहरात ये-जा करण्यासाठी मगरपट्टा-भैरोबानाला-लुल्ला नगर चौक- गंगाधाम चौक-मार्केट यार्ड मार्गाचा वापर करावा.

सातारा- सांगली -कोल्हापूरकडे जाणारी वाहने बेंगळुरू महामार्गमार्गे, नवले ब्रिज, कात्रज चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील. तर मुंबई-नाशिक कडून पुणे शहरात येणारी वाहने हॅरिश ब्रिज-बोपोडी-चंद्रमा-गोल्फ चौक, मार्केट यार्ड मार्गाचा वापर करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयात भाजपचा दारुण पराभव! काँग्रेसचा 21 जागांवर दणदणीत विजय; वारं फिरलं?

मासिक पाळीमुळे चाचणी चुकणार नाही! महिला पोलीस उमेदवारांसाठी सरकारचा दिलासादायक निर्णय

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

प्राणीप्रेमींसाठी खास पर्वणी! पुण्यात 'सकाळ पेटोपिया २०२६' महोत्सवाला सुरुवात; शहामृग अन् मकाऊ पोपट ठरतायत मुख्य आकर्षण

माजी शिक्षणमंत्र्यासह 565 जणांना अटक; सरकारच्या माजी प्रमुखाचं घर जाळलं, आणखी एक देश सत्तांतराच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT