Pune Vimannagar The Noir Pub Raid Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील नामांकित पबमध्ये पोलिसांची धाड! नववर्षाच्या बेकायदा पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५२ जणांवर गुन्हा दाखल

Pune Vimannagar The Noir Pub Raid News : पुण्यातील विमाननगर परिसरातील द नॉयर पबमध्ये परवाना न घेता सुरू असलेल्या बेकायदा नववर्ष पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहाटे मोठी कारवाई केली. पब मालकासह ५२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २ आरोपी फरार आहेत. पोलिस तपास सुरू.

Alisha Khedekar

  • विमाननगर परिसरातील द नॉयर पबमध्ये परवाना नसताना अवैध नववर्ष पार्टी सुरू

  • उत्पादन शुल्क विभागाने पहाटे छापा टाकून १७८ विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

  • DJ-साउंड सिस्टम, लॅपटॉप, सोफा-खुर्ची व फॉग मशीनसह ₹3.67 लाखांचा मुद्देमाल जप्त

  • पब मालकासह 52 आरोपींवर गुन्हे; 2 आरोपी फरार, तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या शहरांमधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढत आहेत. तसेच बेकायदेशीररीत्या विविध धंदे सुरु आहेत. याप्रकरणात अनेकदा पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीर गोष्टींचा डाव उधळला आहे. तरीही अनेक जण बेकायदेशीररित्या दारू, अमली पदार्थांची तस्करी, पब यासारखे धंदे करतात. अशाच प्रकारच्या एका धंद्याचा विमाननगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

विमानगर परिसरातील एका पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी महिला आणि पुरुष अशा पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पब मालक अमरजित सिंग संयु याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द नॉयर पबमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षक अतुल कानडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. येथून ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आता आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. तर दुसरीकडे नियम डावलून अनेक ठिकाणी बेकायदा पार्ट्यांचे सुद्धा आयोजन केले जाते अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची २१ भरारी पथके तैनात करण्यात आल्याचे कानडे यांनी सांगितले .

विमाननगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कोणताही परवाना न घेता हॉटेल द नॉयर (रेड जंगल) एअरपोर्ट रोड, येथे पार्टी सुरू असल्याची माहिती अधीक्षक कानडे यांना मिळाली होती . त्यानुसार पथकाने छापा टाकला. यावेळी विदेशी मध्याच्या 178 बाटल्या मिळून आल्या. अवैध मद्य व्यवसाय चालू ठेवण्या वापरलेले साहित्य खुर्ची, सोफा, लाकडी टी पॉय, लोखंडी, स्पिकर, साऊंड, लॅपटॉप, एक संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलो. वरीलप्रमाणे सदर गुन्हयामध्ये एकुण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली त्यापैकी दोन आरोपी पब चालक व व्यवस्थापक यांचा शोध सुरु असून फरार घोषित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Politics: ज्यांचे तिकीट कापले जाईल, त्यांना आमदारकी; नाराज इच्छुकांसाठी भाजपची नवी ऑफर

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजी; कोणाच्या वाटेला किती जागा? वाचा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

Skin Care Tips: न्यू ईयरच्या पार्टीत मेकअपशिवाय करा ग्लो; फक्त ३ दिवस करा ही स्किन केयर रूटीन

Shocking : २० रुपये देण्यास नकार दिला, रागात नवऱ्याने बायकोची गळा दाबून केली हत्या, नंतर स्वत: धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

SCROLL FOR NEXT