Pune IAS Officer Pooja Khedkar Posting  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: खासगी गाडीवर लाल दिवा भोवला; IAS अधिकारी पूजा खेडकर यांची थेट वाशिमला बदली, काय आहे प्रकरण? VIDEO

Pune IAS Officer Pooja Khedkar Posting In Washim: पुण्याच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आलीय. खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. खासगी गाडीवर लाल दिवा आणि वरिष्ठांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीय. वरिष्ठ अधिकाऱ्याचे चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी पुजा खेडकर रुजू झाल्या होत्या. यांची अखेर बदली करण्यात आलीय.

नेमकं प्रकरण काय?

आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आलीय. कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशन कार्यकाळ पूर्ण करावा (Pune IAS Officer Pooja Khedkar Transferred) लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांत काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच आयएएस पूजा खेडकर यांना देखील ३ जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्याचे चेंबर बळकावल्याचा आरोप

आता आयएएस पूजा खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला (Pune IAS Officer) होता. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे चेंबर बळकावल्याचा आरोप केला होता. खेडकर यांनी खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी. तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचं देखील पुण्याचे कलेक्टर दिवसे यांनी म्हटलं होतं. खेडकर यांची मुख्य सचिवांकडे तक्रार केली (Pune News) होती.

पूजा खेडकर आहेत तरी कोण?

पुजा खेडकर या २०२३ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मागील जून महिन्यात खेडकर यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच खेडकर यांनी अधिकाऱ्यांकडे (Pooja Khedkar Transfer) वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्याची तक्रार होती. पूजा या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची मुलगी असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT