IAS Tukaram Mundhe: IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, १९ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २२ वेळा ट्रान्सफर

Tukaram Mundhe Got Transferred Again: तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे आता असंघटित कामगार पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
IAS Tukaram Mundhe: IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, १९ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २२ वेळा ट्रान्सफर
Tukaram MundheSaam TV
Published On

तुकाराम मुंढे यांची दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन बदली करण्यात आलीय. विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. अप्पर मु्ख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंढे यांना बदलीचं पत्र दिल्याची माहिती मिळत आहे.

तुकाराम मुंढे आता बदली झाल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या पदाचा कारभार आता राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळत (Tukaram Mundhe Transferred) आहे.

तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी (Tukaram Mundhe) आहेत. तुकाराम मुंडे त्याच्या प्रामाणिकपणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणून ओळखले जाते. कारण तुकाराम मुंडे यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत २२ वेळा बदली झाली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे बदल्यांना सामोरे जावे लागल्याचं मानलं (IAS Officer) जातंय. कडक शिस्तीमुळे त्यांना अनेकदा अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केलीय.

IAS Tukaram Mundhe: IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, १९ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २२ वेळा ट्रान्सफर
Tukaram Mundhe Transfer : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मागील ४ महिन्यांतील तिसरी बदली, आता कोणती जबाबदारी मिळाली?

तुकाराम मुंढे एक शिस्तप्रिय अधिकारी असल्याचं मानलं जातं. मुंढे जिथे जातात तिथे दबदबा निर्माण करतात. त्यांनी नवी मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलेलं (Development Commissioner Unorganized Workers) आहे. पुण्यात पीएमपीएलचे आयुक्त म्हणून देखील मुंढे यांनी काम पाहिलं. त्यांच्या कामाच्या धडाक्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरते. तुकाराम मुंढे धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. तुकाराम मुढेंची पुन्हा बदली झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

IAS Tukaram Mundhe: IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, १९ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २२ वेळा ट्रान्सफर
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढणार? कामात दिरंगाई केल्याचा ठपका, प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com