Vaishnavi Hagawane Whatsapp Chats Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Chats: 'पिंकी ताईंनी खूप मारलं अन्..', वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला सगळंच सांगितलं; पण ही पिंकी आहे तरी कोण?

Whatsapp Chat Vaishnavi Hagawane: मुळशी तालुक्यातील २५ वर्षीय वैष्णवी हगवणेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर वैष्णवीचे व्हॅट्सअॅप चॅट्स समोर आले आहेत.

Bhagyashree Kamble

मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तिचे पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांना अटक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर वैष्णवी आणि तिच्या मैत्रणीसोबत झालेल्या व्हॅट्सचॅटचा स्क्रीनशॉट समोर आला आहे. यात तिने सासरच्यांकडून कशापद्धतीने छळ केला जात होता, याची माहिती तिने दिली आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे काही व्हॉट्सअॅप चॅट्स आणि व्हॉईस नोट्स समोर आल्या आहेत. या चॅट्समध्ये ती आपल्या मैत्रिणीला सासरचे लोक कशापद्धतीने मानसिक आणि शारीरिक त्रास देतात, याबाबत माहिती दिली आहे. यासह तिने पिंकी ताईकडून (करिश्मा हगवणे) होत असलेल्या जाचाचा उल्लेख केला आहे. यात तिने स्पष्टपणे तिला खूप त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे.

या चॅट्समध्ये मैत्रीण देखील भाऊजींनी तुझी बाजू घेतली नाही का?, असा प्रश्न विचारते, त्यावर वैष्णवी व्हॉईस नोटद्वारे, 'मला सासरची मंडळी मारत असताना दाजी बघत होते, त्यानंतर त्यांनी देखील हात उगारला' असं तिने सांगितलं. यानंतर वैष्णवीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. याबाबत तिने आपल्या वडिलांसोबतही चर्चा केली. मात्र, वडिलांनी यावर 'विचार करू' असं उत्तर दिल्याचं वैष्णवीने सांगितलं.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा तिची मोठी जाऊ मयुरी हगवणे हिनं केला आहे. मयुरीनं सांगितलं, “घरातील सगळे निर्णय करिश्माच घेत होती. ती म्हणेल तीच पूर्व दिशा, अशी घरात परिस्थिती होती. कोणत्या साड्या नेसायच्या, कोणती भाजी करायची यापर्यंत तीच ठरवायची. घरात तिचं कायमस्वरूपी वर्चस्व होतं. ती दोन्ही भावांपेक्षा पाच वर्षांनी मोठी असून तिनं अजून लग्न केलेलं नाही. तिला स्वतःचं कुटुंब नको, हगवणे कुटुंबावर संपूर्ण नियंत्रण हवं आहे.” असा खुलासा मयुरीने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT