Pune Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहाःकार! मुसळधार पावसामुळे विद्यार्थिनीवर कोसळलं भलं मोठ्ठ झाड अन् पुढे...

Pune News : पुण्यात मागील काही तासांपासून जोरदार पाऊस बसरत आहे. पावसामुळे पाषाण भागात एक मोठ्ठ झाड खाली कोसळले. झाड पडून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. पुण्यासह पालघर आणि नाशिकमधील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील पाषाण भागात पावसामुळे झाड पडल्याची माहिती समोर आली आहे. पंचवटी परिसरातील निशिगंध इमारतीसमोरचे भलेमोठे झाड पडले. झाडाखाली सापडलेली विद्यार्थिनी जखमी झाली. झाड पडल्याने त्याच्याखाली एक चारचाकी आणि दुचाकी अडकली. या घटनेमध्ये सी-डॅक सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज येथे शिकत असलेली काजल (वय २२ वर्ष) नावाची विद्यार्थिनी दुखापतग्रस्त झाली.

झाड पडल्यानंतर घटनास्थळी पाषाण अग्निशमन केंद्राचे अधिकारी दाखल झाले. जखमी झालेल्या काजलला अग्निशमन दलाच्या जवानांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयामध्ये काजलवर उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे. चारचाकी आणि दुचाकी गाड्यांना देखील झाडाखालून बाहेर काढण्यात आले आहे.

पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पुण्यातील धानोरी, टिंगरे नगर, मुंजाबा वस्ती भागात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप झाला. अनेक वाहने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बंद पडली. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन सुद्धा पाण्यात बंद पडल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा

Lionel Messi : कोलकात्यात राडा! बाटल्या फेकल्या, पोस्टर फाडले; मेस्सीने फक्त १० मिनिटात मैदान सोडले, पाहा व्हिडिओ

Kitchen Hacks : कॉफी पावडर गोठून घट्ट झाल्यास काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: आयटी पार्क हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडी

Shocking : बाप की हैवान! सावत्र बाप लेकीच्या छातीला स्पर्श करायचा, मिठ्या मारायचा अन्..., मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT