Maharashtra Weather Alert  Saam TV news
मुंबई/पुणे

Pune Rain : पुणेकरांनो सावध राहा... पुढील ४ तास मुसळधार पावसाचा इशारा, १३ जिल्ह्यांमध्ये धो धो बरसणार

Maharashtra Weather Alert: पुणे, सातारा, रायगड, नाशिकसह १३ जिल्ह्यांत पुढील ४ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ५० किमी प्रतितासपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार तास पुणे, साताऱ्यासह रायगड अन् नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील चार तास राज्यात जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील चार तास कुठे कुठे पाऊस कोसळणार -

महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांसाठी पुढील ४ तासांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, रायगड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे जोरदार वारे अपेक्षित आहेत. दुसरीकडे, जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि धाराशिव या जिल्ह्यांतही विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागांत वाऱ्याचा वेग ४० किमी प्रतितास राहील. हवामान खात्याने या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

१४ जिल्ह्यांत मान्सून-पूर्व पावसाचा जोर वाढणार

आजपासून पुढील 15 दिवस मान्सून केरळात दाखल होईपर्यंत मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून-पूर्व वळवाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात विजा, जोरदार वारे आणि वादळासह गडगडाटी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस मान्सूनचा नसून, मान्सून-पूर्व वळवाचा आहे. अरबी समुद्रात आणि तेलंगणा राज्यावर केंद्रित असलेल्या दोन चक्रीय वाऱ्यांच्या संयोगातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांवर याचा विशेष परिणाम दिसेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असेल.

हवामान खात्याने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेतीच्या कामांना गती मिळेल, तर वादळामुळे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता असून, स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT