Hadapsar Pune Family Dispute Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : पूजेचा अधिकार माझाच, देव्हाऱ्यातील मूर्तीवरून सासू–सुनेत वाद पेटला; कोर्टात नेमकं काय घडलं?

Hadapsar Pune Family Dispute: हडपसरमध्ये सासू विरुद्ध सून सुरु झालेला कौटुंबिक वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला. देवाच्या टाक आणि मूर्तीवरून सुरू झालेल्या या वादात न्यायालयाने सासूची बाजू ग्राह्य धरत तिला घटस्थापनेच्या दिवशी पूजाधिकार दिला आहे.

Alisha Khedekar

  • हडपसरमध्ये देव्हाऱ्यावरून सासू सूचीमध्ये झालेला वाद थेट न्यायालयात गेला.

  • न्यायालयाने सासूच्या चाळीस वर्षांच्या परंपरेला मान्यता दिली आहे.

  • सासूला घटस्थापनेच्या दिवशी देवाचे टाक व मूर्ती पूजेसाठी मिळणार.

  • हा आदेश तात्पुरता असला तरी धार्मिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित झाले.

सागर आव्हाड, पुणे

कौटुंबिक वादांच्या अनेक उदाहरणांमध्ये न्यायालयीन लढती होताना आपण ऐकतो. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हडपसर परिसरातील एका सासूने आपल्या सुनेविरुद्ध केवळ घरगुती तंट्यांवरच नव्हे तर कुटुंबाच्या परंपरेशी जोडलेल्या देव्हाऱ्यातील देवाचे टाक आणि मूर्ती मिळाव्यात यासाठी न्यायालयाची धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात सासूची बाजू ग्राह्य धरत तिला न्याय दिला आहे.

सासू आणि सून यांच्यातील वादाचा संबंध केवळ घरगुती भांडणांपुरता मर्यादित न राहता धार्मिक परंपरांपर्यंत गेला. सुनेच्या ताब्यात असलेल्या बंगल्यात पारंपरिक देव्हाऱ्यातील टाक व मूर्ती असल्याने, घटस्थापनेच्या निमित्ताने पूजा करण्याचा अधिकार आपल्याला मिळावा, अशी मागणी सासूने न्यायालयात केली.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एस. कवडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, सासूला घटस्थापनेच्या दिवशी देवाचे टाक व मूर्ती पूजेसाठी मिळतील. याशिवाय, सून राहात असलेल्या बंगल्यात सासू व पतीच्या वस्तू कशा प्रकारे हस्तांतरित केल्या जातील, याचे नियोजन दोन्ही पक्षांनी न्यायालयात सादर करावे, अशा सूचनाही दिल्या.

सासूने न्यायालयात दावा दाखल करताना सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. सुनेने घरगुती भांडणाच्या पार्श्वभूमीवर पती व सासूला घराबाहेर काढून बंगला बळकावला असल्याचे सासूचे म्हणणे आहे. तसेच, सुनेच्या कथित शारीरिक आणि मानसिक छळामुळे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळावे, अशी मागणीही सासूने केली.

महिलांचे संरक्षण कायदा 2005  अंतर्गत विविध कलमांचा आधार घेतला.कलम 19 (3) नुसार बंगल्यात सुरक्षित वास्तव्याचा अधिकार मिळावा.कलम 18 (अ) व (ड) नुसार सून प्रत्यक्ष वा फोनवरून धमक्या देऊ नये. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला. सुनेच्या वकिलांनी सासूबाईंनी घरी येऊन घटस्थापना करावी,असा युक्तिवाद केला. मात्र, सासू मागील चाळीस वर्षांपासून देवाचे टाक व मूर्ती पूजत असल्याचा मुद्दा अॅड. जान्हवी भोसले व अॅड भालचंद्र धापटे यांनी मांडला. त्यावर न्यायालयाने सासूची बाजू मान्य करत तिला तात्पुरता न्याय दिला.

भारतीय समाजात देव्हाऱ्याचे स्थान केवळ धार्मिकच नाही तर भावनिक नात्यांशी जोडलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगत असून, घरगुती वाद किती खोलवर जाऊ शकतात याचे हे उदाहरण ठरले आहे. सासूला देवाचे टाक व मूर्ती पूजेसाठी मिळण्याचा न्यायालयाचा आदेश तात्पुरता असला, तरी त्याने कौटुंबिक वादातील धार्मिक परंपरांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पुढील सुनावणीत या वादाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी सासूला न्याय मिळाल्याने तिला घटस्थापनेच्या निमित्ताने परंपरा टिकवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sahibzada Farhan AK- 47 celebration : मला लोकांची...; AK-47 सेलिब्रेशनवर फरहान काय म्हणाला?

Navratri 2025: नवरात्रीत या वस्तूंची करा खरेदी, घरात कधीच कशाचीही कमी पडणार नाही!

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

Pachora Viral Video: ओ प्रकाश भाऊ, कुदो मत! पण पाटील काही ऐकेना; पूर आलेल्या नदीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची उडी

आम्ही एकत्रच! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र; बॅनर पुण्यात, पण चर्चा महाराष्ट्रात | VIDEO

SCROLL FOR NEXT