Pune Dam Overflow : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील धरणं १०० टक्के ओव्हरफ्लो

Pune News : पुण्यातील मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली असून ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विसर्गामुळे मुठा, पवना, भीमा, इंद्रायणीसह प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
Pune Dam Overflow : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील धरणं १०० टक्के ओव्हरफ्लो
Pune NewsSaam tv
Published On
Summary
  • पुणे जिल्ह्यातील २६ पैकी १७ धरणं शंभर टक्के भरली आहेत.

  • धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडल्याने प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

  • यंदा मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा झाल्याने परिस्थिती सुधारली आहे.

  • शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता पुढील वर्षापर्यंत दूर झाली आहे.

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मे महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे. परतीच्या काळातही पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पुण्यातील धरणं तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे शंभर टक्के ओव्हरफ्लो झाली असून, ८ धरणे शंभरीच्या आसपास आहेत. फक्त एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा २१७.९९ टीएमसी असलेल्या धरणांमध्ये ९९.९५ टक्के पाणी साठा असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता पुढील वर्षापर्यंत दूर झाली आहे.

मागील चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७४५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने जूनमध्ये काही धरणे ओव्हरफ्लो झाली होती. जुलैमध्ये पश्चिम पट्ट्यातील धरणांत नव्याने पाण्याची आवक झाली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे धरणे भरून वाहू लागली.

Pune Dam Overflow : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील धरणं १०० टक्के ओव्हरफ्लो
Weather Update: पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा

या धरणांमधून डाव्या-उजव्या कालव्यांना, विद्युतगृहांना आणि सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, घोड व नीरा या नद्या दुथडी भरून वाहिल्या. सध्या विसर्ग कमी करण्यात आला असला तरी पावसाचा जोर कायम राहिला तर नद्यांमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते.

Pune Dam Overflow : पुणेकरांनो पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील धरणं १०० टक्के ओव्हरफ्लो
Pune: पुण्यातील प्रसिद्ध कॉलेज कॅम्पसमध्ये आढळला मृतदेह, विद्यार्थी घाबरले अन् सर्वांची झाली पळापळ

गेल्या वर्षी धरणांत केवळ १३२.४० टीएमसी (६६ टक्के) पाणीसाठा होता. यंदा मात्र दुप्पट साठा झाल्याने पाण्याची स्थिती सुधारली आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणांत एक जूनपासून ७९.९४ टीएमसी नव्याने पाणी दाखल झाले आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरणांत ४८.३०६ टीएमसी (९९.४५ टक्के) साठा आहे. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणांत ६७.९३ टीएमसी नव्याने साठले आहे. याशिवाय उजनीत ५३.५७ टीएमसी, मुळशीत १९.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com