Pune Gutkha Seizure 
मुंबई/पुणे

Pune FDA : पुण्यात रात्रीच्या अंधारात महामार्गावर थरार! १ कोटींचा गुटख्याचा ट्रक पकडला; FDA ची सर्वात मोठी कारवाई

Pune FDA : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; मध्यप्रदेशातून आणला जाणारा १ कोटी १३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त. सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक ताब्यात, चार आरोपींवर गुन्हा दाखल.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे (पिंपरी चिंचवड प्रतिनिधी):

Pune Gutkha Seizure : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जप्त केला आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे.

६ तास चालला थरार:

पुणे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांना मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. १८ सप्टेंबर रोजी एफडीएच्या पथकाने संगमनेरपासून राजगुरुनगर टोलनाक्यापर्यंत जवळपास ६ तास या ट्रकचा थरारक पाठलाग केला आणि शेवटी ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळवले.

चौघांवर गुन्हा दाखल;

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नफीस मेहबूब खान (वाहन चालक), निलेश राठी व अरुण पाटील (पुरवठादार), मेसर्स जे. एम. डी. इंटरप्रायझेस (वाहन मालक) आणि संजय माटा (वाहतूकदार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

'मोक्का' लावण्याची शिफारस

राज्यात बंदी असलेला गुटखा आणणे हा एका संघटित गुन्हेगारीचा कट असल्याने, या प्रकरणात आरोपींवर 'मोक्का' (MCOCA) कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलीस विभागाला दिली आहे. चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : या 6 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

फायनान्स कंपन्यांची मुजोरी शेतकऱ्यांच्या मुळावर, हप्ते फेडण्यासाठी घर विकावं लागणार

SAAM MUSIC च्या नव्या भक्तिगीतातून त्र्यंबकेश्वर महादेवाची महिमा; शिवभक्तांसाठी भक्तीमय पर्वणी|VIDEO

बँकांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित नाही; PNB बँकेतून सुमारे 35 कोटी गायब

ठाकरे-फडणवीस एकत्र येणार? पुढच्या पाच महिन्यात राजकीय भूकंप?

SCROLL FOR NEXT