School Holidays Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! पुण्यानंतर आणखी एक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर, कारण काय?

pimpri chinchwad school holiday : पुण्यानंतर आणखी एक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Akshay Badve

पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये

पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय

स्पर्धा मार्गावरील शाळा २० जानेवारी रोजी बंद करण्यात येणार

विद्यापीठातील परीक्षांचे पुनर्नियोजन जाहीर

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील काही शाळांना २० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर या सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतला आहे.

शहरात सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहेत. पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी शाळांना मंगळवारी २० रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील जे एम आणि एफ सी रस्ता उद्या वाहतुकीसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. पुणे शहरातील काही मार्गांवर असलेल्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परीक्षा पुढे ढकलणार

पुणे जिल्ह्यात होत असलेल्या ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनिमित्त संबंधित परिसरातील शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्थांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यालयास उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या हिवाळी सत्र परीक्षांचे पुनर्नियोजन होणार आहे. या संबंधित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सोमवारी होणाऱ्या हिवाळी सत्रामधील विविध अभ्यासक्रमांच्या नियोजित परीक्षा पुनर्नियोजित करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील शाळांना सुट्टी का जाहीर केली?

पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT