Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Crime News: अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; त्रासलेल्या तरूणीनं खाल्ली उंदीर मारण्याची वडी अन्...

Kondhwa girl harassment complaint: पुण्यातील कोंढवा परिसरात एका तरूणीनं उंदीर मारण्याची वडी खात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

सचिन जाधव, साम टीव्ही

छेडछाड आणि धमक्यांना कंटाळून एका तरूणीनं उंदीर मारण्याची वडी खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. पीडित तरूणीला सातत्याने त्रास देणाऱ्या आरोपी तरूणाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूण वारंवार फोन करायचा. तसेच तिला लग्नासाठी दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी नकार दिल्यास रस्त्यावरून नेणार असल्याचीही धमकी त्याने दिली. तसेच एडिट केलेले अश्लील फोटो व्हायरल करणार असल्याचं त्याने सांगितलं. तो वारंवार तरूणीला ब्लॅकमेल करत होता.

तरूणाच्या याच त्रासाला कंटाळून तरूणीने टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं. तिने उंदीर मारण्याची वडी खात आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणानंतर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात तरूणीचा जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, याचा अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

Night Sleeping Time: रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? योग्य वेळ जाणून घ्या

ठाकरेंच्या डरकाळीनंतर अमराठी व्यापाऱ्यांची मराठी शिकण्यास सुरूवात | VIDEO

SCROLL FOR NEXT