Vanraj Andekar Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Gangwar : पुण्यात पुन्हा गँगवॉर! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची निर्घृण हत्या; बस स्टँडवरच गोळ्या झाडल्या अन् कोयत्याने वार

Pune Gangwar Latest Update : पुण्यातील बालाजीनगर बस स्टँडवर झालेल्या गोळीबारात अक्षय म्हस्के याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune Andekar-Komkar gangwar latest news : मागील काही दिवसांपासून शांत असलेलं पुण्यातील गँगवॉर पुन्हा भडकल्याचे समोर आले आहे. बालाजीनगर बस स्टँडवर आंदेकर टोळीकडून आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून खून केल्याची घटना समोर आली आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल केला असून शोध घेतला जात आहे.

आंदेकर टोळीच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय म्हस्के असल्याचे समोर आले आहे. याआधी आयुष कोंमकर आणि गणेश काळे यांचा खून करण्यात आला होता. बालाजीनगर बस स्टँडवर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात म्हस्के याचा मृत्यू झाला, तर अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून गोळीबार झालेला असू शकतो. या प्रकरणात आंदेकर - कोमकर गँगवॉरची किनार असल्याचा अंदाजही आहे.

बालाजीनगर बस स्टँडवर झालेल्या गोळीबारनंतर पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा फोफावणार का? असा सवाल उपस्थित झालाय. या गोळीबाराच्या घटनेनंतर बालाजीनगर परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. मृत अक्षय म्हस्के याचा भाऊ वनराज आंदेकर खुनालीत आरोपी आहे. त्याच्यावरही वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद आहे.

बालाजीनगर बस स्टँडवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहित मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळावर पंचनामा करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली असून यातून काही पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अक्षय म्हस्के याचा भाऊ वनराज आंदेकर खूनातील आरोपी असल्याने आंदोकर टोळीतील गुंडांनीच ही हत्या केल्याचं बालाजीनगरमध्ये बोलले जात आहे.

कामावर जात असताना गोळीबार आणि कोयत्याने हल्ला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 'म्हस्के' (आरोपीचा भाऊ) हा कामानिमित्त घराबाहेर पडला होता. त्याच वेळी १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्याला गाठले. हल्लेखोरांनी त्याच्यावर थेट गोळीबार (Firing) केला आणि कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली . आंदेकर टोळीने हा 'रिप्लाय' (बदला) दिल्याचे बोलले जात आहे.

वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये जे जे आरोपी सहभागी होते, त्यांच्या नातेवाइकांना आणि कुटुंबियांना आंदेकर टोळीकडून लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जात आहे. आंदेकर टोळीतील प्रमुख आरोपी सध्या तुरुंगात असले, तरी बाहेर असलेल्या त्यांच्या साथीदारांकडून हे सूडसत्र सुरू असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे आरोपींच्या नातेवाइकांवर हल्ले आणि खुनाचे प्रयत्न झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात सप्टेंबरमध्ये मोठा फेरबदल? ‘या’ दिग्गजांची धाकधूक वाढली; कोणाला लागणार लॉटरी?

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! वनपट्टेधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सरकारी योजनांचा मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर..

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT