Pune Ganeshotsav 2026 DJ And Loudspeaker Permission  AI Image
मुंबई/पुणे

Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात DJ वाजणार, मंडळांना दिलासा

Pune Ganeshotsav DJ Permission Update News : पुण्यातील गणेश मंडळांना मोठा दिलासा! गणेशोत्सवातील १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर आणि DJ वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील गणेश मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास विशेष परवानगी

  • १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबर या पाच दिवसांसाठी ही सवलत लागू

  • नियम व मर्यादा पाळणे बंधनकारक

  • गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

पुण्यात गेले काही दिवसांपासून DJ वॉर सुरू असून अखेर याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान मंडळांना लाऊडस्पीकर वापरण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत विशेष परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, गणेशोत्सवातील ठराविक पाच दिवस ही सवलत लागू राहणार असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या आदेशानुसार, पुणेकरांना यंदाच्या गणेशोत्सवात डीजेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु णेशोत्सवातील ठराविक पाच दिवस ही सवलत लागू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. गणेशोत्सवातील सहावा, सातवा, नववा, दहावा आणि बारावा दिवस अशा पाच दिवशी गणेश मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे गणेश मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच इतर धार्मिक आणि सामाजिक उपक्रम रात्री उशिरापर्यंत आयोजित करता येणार आहेत.

ही विशेष परवानगी सप्टेंबर महिन्यातील १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबर या पाच दिवसांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी पुणे शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत डीजेचा वापर करता येणार आहे. गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.

विविध गणेश मंडळांकडून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला मिळालेल्या या परवानगीमुळे मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, लाऊडस्पीकर वापरताना प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भातील मर्यादा पाळणे आवश्यक राहणार आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT