Ganpati Visarjan Pune x
मुंबई/पुणे

Ganpati Visarjan Pune : मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुका कधी आणि कुठून सुरू होणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Pune Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचा सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. उद्या मिरवणुकांची सुरुवात सकाळी साडेनऊच्या सुमारास होणार आहे.

Akshay Badve

  • पुण्यात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणुकींची सुरुवात उद्या सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

  • प्रमुख मिरवणुका मानाच्या गणपतीपासून सुरु होऊन शहरभर विविध चौकांमध्ये पार पडतील.

  • प्रशासनाने विसर्जन मिरवणुकीस सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

Pune : दहा दिवसांच्या उत्सवानंतर उद्या अनंत चतुर्दशी निमित्त राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुकींचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सुरुवात उद्या सकाळी ९.३० वाजता होणार आहे. मानाच्या गणपतीसह शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरात मोठी गर्दी होते. सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपती पासून होते. याच अनुषंगाने यंदा मानाच्या पाच ही गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मानाचा पहिला म्हणजेच पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती ची मिरवणूक सकाळी ९.३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरुवात होईल. तसेच शहरातील प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी चार वाजता बेलबाग चौकातून सुरू होईल.

मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचं नियोजन कसं असेल पाहुया

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.३० वाजता

बेलबाग चौक: १०.१५ वाजता

कुंटे चौक: ११.४५ वाजता

विजय टॉकीज चौक: १.४० वाजता

टिळक चौक: २.४५ वाजता

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): ९.४५ वाजता

बेलबाग चौक: १०.३० वाजता

कुंटे चौक: १२ वाजता

विजय टॉकीज चौक: १.५५ वाजता

टिळक चौक: ३ वाजता

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १० वाजता

बेलबाग चौक: ११ वाजता

कुंटे चौक: १२.४५ वाजता

विजय टॉकीज चौक: २.३० वाजता

टिळक चौक: ३.३० वाजता

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळ

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.१५ वाजता

बेलबाग चौक: ११.३० वाजता

कुंटे चौक: १.३० वाजता

विजय टॉकीज चौक: ३ वाजता

टिळक चौक: ४ वाजता

मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा

लोकमान्य टिळक पुतळा (सुरुवात): १०.३० वाजता

बेलबाग चौक: १२ वाजता

कुंटे चौक: २ वाजता

विजय टॉकीज चौक: ३.३० वाजता

टिळक चौक: ४.३० वाजता

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

बेलबाग चौक (सुरुवात): ४ वाजता

गणपती चौक: ४.५५ वाजता

कुंटे चौक: ६ वाजता

विजय टॉकीज चौक: ६.३० वाजता

टिळक चौक: ७.३० वाजता

अखिल मंडई मंडळ

बेलबाग चौक (सुरुवात): ७ वाजता

गणपती चौक: ७.२५ वाजता

कुंटे चौक: ८.३० वाजता

विजय टॉकीज चौक: ९.२० वाजता

टिळक चौक: ११.२५ वाजता

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट

बेलबाग चौक (सुरुवात): ६.३० वाजता

गणपती चौक: ६.५५ वाजता

कुंटे चौक: ८ वाजता

विजय टॉकीज चौक: ९.४० वाजता

टिळक चौक: १०.४५ वाजता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजधानी अन् वंदे भारतच्या तिकीट बुकिंगमध्ये ५०० रूपयांची बचत करायचीय? मग हा ऑपशन एकदा बघाच

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Genelia – Riteish Deshmukh: एवढ्या रागात कुठे निघालास? जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखचं खट्याळ उत्तर, पाहा VIDEO

Youtube आणि Disney मध्ये तणाव! 31 ऑक्टोबरपासून बंद होणार 'हे' लोकप्रिय चॅनेल्स, युजर्सना मोठा धक्का

आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणीची आत्महत्या, बहिणीच्या खोलीत आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT