Pune crime news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : भयंकर! हॉकी खेळण्याचा वादातून चौघांकडून मित्राच्या ३ बहिणींवर प्राणघातक हल्ला; पुण्यातील घटना

हॉकी खेळण्याच्या वादातून ४ जणांनी मित्राच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : पुण्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. हॉकी खेळण्याच्या वादातून ४ जणांनी मित्राच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी रामनाथ सहानी,राम सहानी आणि दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे भागात हॉकी खेळण्याचा वादातून चार जणांनी केला मित्राच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. चार जणांनी लोखंडी रॉड, पाईपने अल्पवयीन मुलींना मारहाण केली आहे.

टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाली आहे. ११, १५ आणि १६ वर्षीय मुलींवर हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. कृष्णा सहानी यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या (Pune) वारजे भागात रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दांगट वस्ती जवळ घडली. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. या दोघांमध्ये मैदानावर हॉकी खेळावरून काही वाद झाले होते.

या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादी कृष्णा याला मारण्यासाठी थेट घरात प्रवेश केला. यावेळी आरोपींना कृष्णा दिसला नाही. त्यामुळे त्यांनी घरातील उपस्थित असलेल्या महिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

या हल्ल्यात कृष्णा यांची आई तसेच तीन लहान बहिणी यांच्यावर रामनाथ सहानी, राम सहानी आणि इतर दोन साथीदारांनी हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या लहान मुलींना नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून यातील दोन जणींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर वारजे पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Jio Recharge Plan: जिओ 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; ग्राहकांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलन

IAS Mittali Sethi: कोण आहेत नंदुरबारच्या IAS मिताली सेठी? दोन्ही मुलांचे घेतलेय सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन

SCROLL FOR NEXT