Nanded Crime
Nanded Crime Saamtv

Nanded Crime News: धक्कादायक! वह्या पुस्तके नव्हे, शाळकरी मुलांच्या दप्तरात खंजीर अन् एयरगन; नांदेडमध्ये चाललयं काय?

Nanded News Update: विद्यार्थ्यांनी एक-एक हजार रुपये जमा करुन आपल्या वर्ग मित्राला वाढदिवसानिमित्त 15 हजार रुपयांचा देशी कट्टा गिफ्ट म्हणून देण्याची योजनाही आखली होती

संजय सुर्यवंशी..

Nanded News: राज्यात वाढत्या गुन्हेगारीबद्दल अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळत असतात. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भरदिवसा हत्या, दरोडे, या सारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळते. वर्चस्व वादातून दोन गटांमध्ये होणाऱ्या भांडणांच्या अनेक घटना घडत असतात. मात्र गुन्हेगारी जगताचे आता शाळकरी मुलांनाही वेड पाहायला मिळत आहे.

याच वर्चस्वाच्या स्पर्धेतून शाळेतील विद्यार्थी खंजर आणि एअर गन बाळगत असल्याचा प्रकार नांदेडच्या एका शाळेत उघडकीस आल्याची माहिती आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ माजली आहे. (Crime News)

Nanded Crime
Viral Video: वय विसरा अन् उत्साह पाहा! ‘चुम्मा चुम्मा दे’ गाण्यावर शिक्षिकेचा भन्नाट डान्स; विद्यार्थ्यांचा टाळ्या शिट्ट्यांचा पाऊस, पाहा VIDEO

नांदेड (Nanded) शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून अनेक गँग तयार झाल्या आहेत. काही दिवसापर्वी नांदेड शहरातील एका नामांकित शाळेमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यर्थ्यांमध्ये राडा झाला होता.याच राड्यातून एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यंकडे चक्क दफ्तरात एअर गन आणि खंजीरे आढळून आले आहे. शिक्षकांना संशय आल्यानंतर विद्यार्थ्यांची दप्तरे तपासली असता त्यामध्ये एक एअर गन आणि चार खंजर आढळून आले.

घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवले आणि हा सर्व प्रकार पालकांच्या निदर्शनास आणून दिला. अवघ्या नववीत शिकणाऱ्या विध्यार्थ्याकडे खंजर आणि एअर गण आढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे..

Nanded Crime
Viral Video: अरेरे, खतरनाक! हेल्मेट घातले नाही म्हणून पोलिसांनी अडवले, पठ्ठ्याने त्यांना रॅप सॉंगचं ऐकवले; VIDEO तुफान VIRAL

धक्कादायक बाब म्हणजे 'गॅंग' करून राहणाऱ्या एका गटातील विद्यार्थ्यांनी एक-एक हजार रुपये जमा करुन आपल्या वर्ग मित्राला वाढदिवसानिमित्त 15 हजार रुपयांचा देशी कट्टा गिफ्ट म्हणून देण्याची योजनाही आखली होती. मात्र ऐनवेळी हा प्लॅन फसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार धक्कादायक असून पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत..(Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com