film producer arrested  Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad News : चित्रपट निर्मात्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक; धक्कादायक कारण समोर

film producer arrested in pimpri chinchwad : पिंपरी चिंचवड पोलिसांनी चित्रपट निर्मात्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेअर मार्केटमधील फसवणूक प्रकरणी ही कारवाई केली.

गोपाल मोटघरे

चित्रपट निर्माता शिवम संवत्सरकार याने गुंतवणूकदाराला 57.70 लाख रुपयांना गंडवलं.

शिवमने बालाजी इंटरप्राईजेस नावाची बनावट फर्म स्थापन केली होती.

'Abbott Wealth' या ॲपच्या माध्यमातून गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणूक करत.

शिवम संवत्सरकारच्या बँक खात्यावर 86.43 लाख रुपये जमा झाले होते.

चीन देशातील एका नागरिकांच्या संपर्कात राहून पुण्यातील एका चित्रपट निर्मात्याने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार केला आहे. निर्मात्याने एका शेअर मार्केटमधील गुंतवणूकदाराला जवळपास 57 लाख 70 हजार 670 रुपयाचा आर्थिक गंडा घातला आहे.

शिवम बाळकृष्ण संवत्सरकार असं या कथित चित्रपट निर्मात्याचे नाव आहे. या प्रकरणात एका गुंतवणूकदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी शिवम संवत्सरकार या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शिवम संवत्सरकार याने शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी बालाजी इंटरप्राईजेस नावाची एक फर्म काढली होती. शिवम संवत्सरकार आणि त्याचा चीन देशातील सहकारी बांमबीनो हे गुंतवणूकदारांना अबॉट वेल्थ ( Abbott Wealth ) या ॲपवर चांगलं परतावा मिळवून देतो, असं आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडत.

गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर पैसे काढत असताना त्यांना वेगवेगळे चार्जेस सांगून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करत असत. या प्रकरणात सायबर पोलिसांनी शिवम संवत्सरकार याच्याकडे केलेल्या तपासात त्याने त्याच्या बँक खात्यावर जवळपास 86 लाख रुपये 43 हजार 119 रुपये प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच शिवम संवत्सरकार याच्याकडे अजून दोन बँकेचे खाते गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवम संवत्सरकार वापरत असलेल्या दोन बँक खात्याच्या विरोधातही जवळपास 15 फसवणुकीच्या तक्रारी असल्याचे देखील समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng Test : इंग्लंडला मोठा धक्का; बेन स्टोक्ससह हुकमी गोलंदाज ओव्हल कसोटीतून बाहेर, प्लेइंग ११ मध्ये ४ बदल

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय समाज पक्षाची शुक्रवारी पुण्यात बैठक

Maharashtra Politics: राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत आमनेसामने; एकाच सोफ्यावर बसले पण नजरानजर टाळली|VIDEO

Nagpur Crime: धक्कादायक! जुन्या घरगुती वस्तूंची विक्री करणाऱ्याला जबर मारहाण; पाकिस्तानी समजून डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

SCROLL FOR NEXT