Pune News X
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर हातोडा, वैशाली हॉटेलवरही पुणे महापालिकेची कारवाई; प्रकरण काय?

PMC News : पुण्यातील फर्ग्युसन रस्ता, जे एम रस्ता आणि डेक्कन परिसरात या परिसरात पुणे महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात आली आहे. गुडलक कॅफे, वैशाली रेस्टॉरंटवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील डेक्कन परिसरातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गुडलक कॅफेवर आज पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या कारवाईमध्ये कॅफेच्या बाहेरील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमित भाग हटवला. या कॅफेच्या साईड मार्जिन बाबत असलेल्या अनधिकृत बांधकाम संदर्भात महापालिकेने ही कारवाई केली.

पुणे महापालिकेने आज फर्ग्युसन रस्ता, जे एम रस्ता आणि डेक्कन परिसरात अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या आस्थापना अनधिकृत आहेत किंवा नियमबाह्य आहेत त्यावर पालिकेने आज जेसीबी फिरवला. गुडलक कॅफेपाठोपाठ वैशाली रेस्टॉरंटवरही महापालिकेने कारवाई केली आहे. वैशाली रेस्टॉरंटचा बाहेरील परिसर अनधिकृत असल्याने पालिकेने जे सी बी चालवला.

गेल्या काही दशकांपासून डेक्कन परिसरात कार्यरत असलेले गुडलक कॅफे हे अनेक पुणेकरांचं आवडतं ठिकाण आहे. जुन्या काळापासून चालत आलेल्या या कॅफेचा काही भाग अनधिकृतरित्या वाढवण्यात आल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेचा बाहेरील भाग म्हणजे टेबल लावण्यासाठी वाढवलेला ओपन स्पेस, तसेच काही अर्धवट छप्पर किंवा पत्रे लावलेली रचना ही अनधिकृत आहे. त्यामुळेच नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कॅफेने साईड मार्जिनच्या असलेल्या नियमांचे सुद्धा उल्लंघन केल्याचे समोर आलं आहे.

पुण्यातील गुडलक कॅफे याची ओळख काही वेगळीच आहे. त्यातील प्रत्येक खवय्येच्या तोंडावर याच कॅफेचे नाव तुम्हाला अनेक वेळेला अनुभवायला मिळाला असेल. कॉलेजच्या तरुणाईपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या कॅफेची ख्याती काही औरच आहे. गुडलक कॅफेमध्ये मिळणारा बन मस्का आणि इराणी चहासाठी केवळ पुणेकरच नाही, तर आसपासच्या शहरांतूनही अनेकजण खास पुण्यात येतात. गुडलक कॅफेची जुनी वास्तू, काउंटर जवळ असलेल्या बन पावाची लादी आणि त्याला लावण्यात आलेला मस्का याच्या तर शेकडो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT