Pune Fake Air Force Jawan Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fake Air Force Jawan: बीडचा न्हावी झाला 'तोतया' एअर फोर्स जवान! वर्दी शिवायला गेला अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Pune Fake Air Force Jawan: पुण्यात एअर फोर्सचा जवान असल्याचे सांगून वर्दी शिवायला गेलेल्या तरुणाचा टेलरने पर्दाफाश केला. बनावट आयकार्ड वापरणाऱ्या या तरुणाला लोहगाव पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

अक्षय बडवे, साम टिव्ही

Pune Fake Air Force Jawan: पुण्यात भारतीय हवाई दलाचा जवान असल्याचे भासवून फिरणाऱ्या एका तरुणाचा प्रकार समोर आला आहे. एअर फोर्सची वर्दी शिवून घेण्यासाठी टेलरच्या दुकानात गेलेल्या या तोतया जवानाला टेलरने ओळखले. संशय आल्यानंतर टेलरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर लोहगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण हवाई दलात कार्यरत नसल्याची कबुली दिली.

शुभम विलास अंबुरे (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून पुण्यातील शिक्रापूर तालुक्यातील एका सलूनमध्ये न्हावी म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, गावाकडे त्याने आपण भारतीय हवाई दलात जवान असल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोहगाव परिसरातील गुरुद्वारा कॉलनी येथील बालाजी टेलर या दुकानात गेला होता. त्याने टेलरला आपण भारतीय हवाई दलात जवान असून एअर फोर्सचा युनिफॉर्म शिवायचा असल्याचे सांगितले. टेलरने त्याच्याकडे अधिक विचारपूस करत ओळखपत्र दाखवण्यास सांगितले.

आरोपीने खिशातून आयकार्ड काढून टेलरला दाखवले. मात्र, हवाई दलातील जवानांची ओळखपत्रे नियमितपणे पाहत असल्याने टेलरला त्या कार्डबाबत संशय आला. त्याने वेळ न दवडता लोहगाव पोलिसांशी संपर्क साधून संबंधित व्यक्तीबाबत माहिती दिली. माहिती मिळताच लोहगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. याबाबत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान अंबुरेने आपण हवाई दलात कार्यरत नसल्याचे मान्य केले. गावाकडे आपण जवान असल्याचे सांगण्यासाठी हा बनाव केल्याची कबुली त्याने दिली. एवढेच नाही तर २०२२ मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या एका हवाई दलातील जवानाचे आयकार्ड आपण वापरत असल्याची कबुली आरोपीने चौकशीत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी हवाई दलाच्या वतीने लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहगाव पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Plane Crash: बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळलं, थरारक VIDEO समोर

Shocking : नांदेड हादरलं! मुलाकडून जन्मदात्या आईची हत्या, नंतर स्वत:ही आयुष्य संपवलं

Weight Loss: रोज व्यायाम आणि डाएट करूनही वजन वाढतंय? मग 'या' 7 कारणांमुळे होत नसेल वजन कमी

Maharashtra News Live Update: बारामती मध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना

Parenting Tips : पालकांसाठी धोक्याची घंटा! मुलाला उशिरा झोपवताय? शरीरात होतात 'हे' ५ गंभीर बदल

SCROLL FOR NEXT