Low water levels at Khadakwasla dam raise concerns of water shortage in Pune and surrounding areas. saam tv
मुंबई/पुणे

पाणी जपून वापरा! पुण्यात पाणी टंचाई; कुठल्या धरणात किती आहे पाणीसाठा?

Pune Dam Water Levels : कमी पावसाचा अंदाज आणि एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे प्रमाण कमी असणार आहे. याचदरम्यान पुण्यातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी उरलाय. खडकवासला धरणातील पाण्याची पातळी घटल्याने आणि प्रशासनाने १५ टक्के पाणी कपात लागू होणार आहे.

Bharat Jadhav

  • पुण्यात पाणीटंचाईची शक्यता, कमी पावसाचा अंदाज

  • खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी

  • प्रशासनाकडून १५% पाणी कपात लागू

हवामान विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. तसेच खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसह एमआयडीसीला दरमहा १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे पुणेकरांना आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांसोबतच पाणीटंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे मॉन्सून कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जलसंपदा मंत्र्यांच्या सूचनेनुसार, भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच काटेकोर नियोजनाचे आदेश दिले आहेत. यंदा मान्सूनमध्ये साधारण पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतर चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. या अंदाजाचा परिणाम पाण्याच्या वापरावर होणार आहे. एप्रिल महिन्यातून जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पत्र पाठवले आहे.

या पत्रात पाणी जपून वापरावे तसेच खडकवासला धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्ट पर्यंत शिल्लक राहील याचं नियोजन करण्याची आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुणे शहरात १५ टक्के पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे. पाणी कपात न केल्यास भविष्यात निर्माण होणाऱ्या टंचाईला सर्वस्वी संबंधित संस्था जबाबदार राहतील, असं स्पष्ट मत जलसंपदा विभागाने महापालिकेला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कुठल्या धरणात किती पाणीसाठा

खडकवासला: ४३ टक्के

पानशेत: ५६ टक्के

वरसगाव: ४६ टक्के

टेमघर: ११.८८ टक्के

एकूण पाणीसाठा: ४५ टक्के

गेल्या वर्षी पाणीसाठा (आजच्या तारखेला): ४१ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत भाजपला कडू का नकोत? प्रहारच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध?

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

Bengaluru Rain: बेंगळूरमध्ये पावसाचा हाहाकार; हॉस्पिटलजवळ भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू

Nanded: पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, पडद्यामागं जोरदार हालचाली

SCROLL FOR NEXT