Pune Crime Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! मैत्रिणीला वैतागून नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून मृत्यूला कवटाळलं

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका ही पुण्यात एका इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला अश्लील मेसेज करायचा.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune :

पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने स्वत:ला पेटवून घेतलं आहे. उपचारादरम्यान १९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याच्या छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळालीये.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रसिद्ध इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ७ मार्च रोजी हा प्रकार घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे पेटवून घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान सिद्धू या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका ही पुण्यात एका इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होती. हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचारी सतीश हा रेणुकाला अश्लील मेसेज करायचा. या सर्व प्रकारमुळे रेणुका खूप घाबरली. याशिवाय हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये राहणारी मुस्कान ही देखील रेणुकाला अभ्यास करू द्यायची नाही आणि जाणून बुजून त्रास द्यायची.

या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने ७ मार्च रोजी हॉस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतलं. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र या घटनेत तिचं शरीर जास्त भाजलं होतं. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT