Pune Double Metro Flyover Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Double Metro Flyover: पुण्यात डब्बल डेकर उड्डाणपूल; मेट्रो-कार एकाचवेळी धावणार, पुणेकरांची वाहतूककोंडी फुटणार, वाचा वैशिष्ट्य

Pune Nagar Double Metro Flyover: रोज अनेकजण पुण्यात अप-डाउन करतात. परंतु पुणे नगर रोडला खूप वाहतूक कोंडी होते. मात्र, आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

पुणे-नगरसाठी होणार डबल डेकर उड्डाणपूल

वरुन मेट्रो धावणार आणि खाली उड्डाणपूल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. पुणे ते नगर प्रवास सुसाट होणार आहे. पु्ण्यातील आयटी पार्क, बिझनेस हब आणि निवासी क्षेत्र असल्याने दररोज जवळपास ३ लाख वाहने येथून प्रवास करतात.सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी खूपच ट्राफिक असते. कधीकधी तर २-३ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा असतात. या प्रवासासाठी अर्धा तास लागतो. यावरच आता उपाय शोधण्यात आला आहे. डबल डेकर एलिव्हेटेड मेट्रो आणि फ्लायओव्हर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

वर मेट्रो अन् खाली उड्डाणपूल (Double Decker Flyover)

पुणे नगर डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर लवकरच बांधून होणार आहे. हा मार्ग ४.७ किलोमीटर लांब असणार आहे. नगर रोडवरुन येरवडा ते खराडी आणि वाघोलीपर्यंत हा रोड बांधण्यात येणार आहे. यामध्ये दोन ब्रिज असणार आहे. वरच्या बाजूला मेट्रो धावणार आहे आणि खाली ४ ते ६ लेनचा उड्डाणपूल असणार आहे. यावरुन खाजगी वाहने, बसेस. मालवाहू वाहने धावणार आहेत.

या प्रकल्पाचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे केले जाणार आहे. शहरी नियोजन आणि पुणे महापालिकेच्याअंतर्गत काम पूर्ण केले जाणार आहे. तर उड्डाणपूलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामंडळांद्वारे (MMRDA) केले जाणार आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार

सध्या येरवडा ते खराडी किंवा वाघोलीसाठी ४५ ते ६० मिनिटे लागतात.प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलावरुन फक्त १५ ते २० मिनिटात हा प्रवास करु शकतात. यामुळे वेळ खूप वाचणार आहे.

या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा आयटी पार्कला होणार आहे. रोज हजारो प्रवास या रोडने प्रवास करतात. या मार्गावर खराडी, ईओएन फ्री झोन, मगरपट्टा आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. त्यामुळे या प्रवाशांना याचा खूप फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT