Pune DJ Controversy Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Pune DJ Controversy: पुण्यामध्ये डीजे प्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावल्याने पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

Priya More
  • पुण्यात दहीहंडी उत्सवात डीजे प्रकरणी मोठी कारवाई

  • पुणे पोलिसांकडून पहिला गुन्हा दाखल

  • बिबवेवाडी मंडळावर ध्वनी प्रदूषणाप्रकरणी गुन्हा दाखल

  • ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावल्याने पुणे पोलिसांची कारवाई

  • पुणे दहीहंडी डीजेसाठी लाऊडस्पीकरचे नवे नियम

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये सध्या डीजेवरून जोरदार वाद सुरू आहे. गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विद्यानंद बापट या तरुणाने केली असून त्याला अनेक पुणेकरांनी सपोर्ट केला आहे. गणेशोत्सवाआधी असणाऱ्या दहीहंडी उत्सावामध्ये अनेक ठिकाणी डीजे लावण्यात आले आहे. या डीजेबाबत पोलिसांनी दिलेल्या नियमाचे पालन न केल्याप्रकरणी एका मंडळाविरोधात कारवाई केली आहे. पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात दहीहंडी उत्सवात पुणे पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावून ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी बिबवेवाडी येथील दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाऊड स्पीकरसाठी ४ बेस आणि ४ टॉप इतकीच परवानगी असताना त्याच्या दुप्पट साऊंड लावणाऱ्या बिबवेवाडी येथील मंडळावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून हे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले आहेत.

राहुल प्रकाश जगताप असे श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. या वर्षीच्या दही हंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ध्वनी प्रदुषणाबाबत सर्वांना इशारा दिला होता की, लाऊंड स्पीकरसाठी ४ बेस आणि ४ टॉप यांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक लाऊंड स्पीकर लावून ध्वनी प्रदुषण केल्यास कारवाई करण्यात येईल.

बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्याकडून पारंपारिक वाद्य वापरणेचा परवाना घेतला. त्यात लाऊड स्पीकर वापरण्याबाबतच्या लेखी आदेशाचा भंग करुन ८ बेस आणि ८ टॉप असे लाऊड स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह दाखल करत कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत राणा दांपत्याच्या गणपती बाप्पाचा विसर्जन

Pav Bhaji Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल झणझणीत पाव भाजी; वाचा सोपी रेसिपी

Pear: बाजारातून गोड आणि रसाळ पेर निवडायचंय? खरेदी करताना हे ४ उपाय लक्षात ठेवा

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT