Pune Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच! पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड

Pune Crime News : पुण्यातील हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा 'खोटारडेपणा' उघड झाला आहे. 'ते' लायटर नव्हे पिस्तूलच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Akshay Badve

दोन अल्पवयीन मुलांना वाहनचोरीप्रकरणी अटक

दोघांकडून देशी बनावटीचं पिस्तूल जप्त

आरोपींच्या विरोधात वाहन चोरीचे ८ गुन्हे

पुण्यातील कोथरूड भागात काही दिवसांपूर्वी एका सोसायटीमध्ये घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींनी थेट सोसायटीमधील सीसीटीव्हीमध्ये पिस्तूल दाखवले होते. ही घटना समोर आल्यावर कोथरूड पोलिसांनी व्हिडिओमध्ये असलेली गोष्ट पिस्तूल नव्हे लायटर असल्याचा ठामपणे दावा केला होता. आता पुणे शहरातील हडपसर पोलिसांनी त्याच तरुणांना वाहन चोरीप्रकरणी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. कॅमेऱ्यात दिसलेले ती गोष्ट लायटर नव्हे पिस्तूल असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोथरूड भागात २ ऑक्टोबर रोजी श्री सुवर्ण सोसायटीत झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नादरम्यान चोरट्यांनी सीसीटीव्हीत पिस्तूल आणि हत्यार दाखवून दहशत निर्माण केली होती. अवघ्या काही वेळातच कोथरूड पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत "ते पिस्तूल नव्हे, लायटरसदृश वस्तू आहे" असा दावा केला होता. त्यामुळे तो प्रकार थंडावला होता.

सहा दिवसांनी हडपसर पोलिसांनी दोन १७ वर्षीय मुलांना वाहन चोरीप्रकरणी पकडले असता त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. तपासादरम्यान, यातील एक मुलगा हा येथील कॅमेऱ्यात पिस्तूल दाखविणारा अल्पवयीन असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे

त्यामुळे त्याच्याकडे तेच पिस्तूल देखील मिळाले. हेच पिस्तूल त्याने कॅमेऱ्यात दाखविल्याचे स्पष्ट झाले. या दोन अल्पवयीनांकडून हडपसर परिसरातील वाहन चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

काय होता कोथरूड पोलिसांचा दावा?

- कॅमेऱ्यात दिसलेली वस्तू ही पिस्तूल नव्हे, पिस्तूलसदृश लायटर आहे.

- प्रकरण गंभीर नाही, संबंधित आरोपी पकडले आहेत

- घटनेमुळे नागरिकांनी घाबरू नये

हडपसर पोलिसांनी केलेली कारवाई काय?

- घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना हाती लागले काही अल्पवयीन तरुण

- यातील एका तरुणाकडून पिस्तूल जप्त

- कोथरूड मध्ये घरफोडी करण्यासाठी गेले असता सी सी टिव्ही मध्ये दाखवले हेच पिस्तूल

- ८ वाहनचोरीचे गुन्हे उघड, एक जिवंत काडतूस ही जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT