Dhankawadi Ahilyadevi Chowk Cylinder explosion Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Fire : सोलापूरहून पुण्यात कामाला आला, चहाच्या टपरीवर काम करताना सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोषचा होरपळून मृत्यू

Dhankawadi Ahilyadevi Chowk Cylinder Explosion : कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एक कामगार अडकलेला असल्याचे समजताच जवानांनी पाण्याचा फवारा मारत त्याला बाहेर काढले.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात असलेल्या एका चहाच्या दुकानात दूध तापवताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत संतोष हेगडे (वय २०) या तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी चारच्या सुमारास दुकानातील कामगार संतोष चहा बनवत असताना अचानक स्फोट झाला. यामुळे ग्राहक आणि अन्य कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, संतोष हेगडे दुकानात अडकला. स्फोटानंतर आग भडकली आणि आगीच्या झळा शेजारच्या दोन दुकानांनाही बसल्या, ज्यामुळे काही प्रमाणात नुकसान झालं.

कात्रज आणि गंगाधाम अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एक कामगार अडकलेला असल्याचे समजताच जवानांनी पाण्याचा फवारा मारत त्याला बाहेर काढले. मात्र, गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तीन सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत असल्याचे आढळून आल्यानं अग्निशमन दलाने हे सिलेंडर ताब्यात घेतलं. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ता मोकळा केला. घटनेचा पुढील तपास धनकवडी पोलीस आणि अग्निशमन विभाग करत आहे.

संतोष हेगडे असं मृत्यू झालेल्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. हृदयद्रावक बाब म्हणजे, या चहाच्या दुकानात आज तो पहिल्याच दिवशी कामावर आला होता. मृत्यू झालेला कामगार सोलापूर जिल्ह्यातील हिजगी गावचा राहिवासी असल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या कामगाराला आई वडील नसल्याची प्राथमिक माहिती देखील मिळाली आहे. दरम्यान, हॉटेल चालक केशव श्रीमंत जाधव हा बीडचा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मृत्यू झालेल्या कामगाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT