Pune Dam Water Level Today Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुणेकरांची चिंता वाढली, धरणामध्ये फक्त २६.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक; वाचा ताजी आकडेवारी

Pune Dam Water Level Today: पुण्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम धरणातील पाण्यावर होत आहे. धरणांमध्ये फक्त २६.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Priya More
  • पुणे शहर आणि जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात घट

  • पाणीसाठ्याची ताजी आकडेवारी आली समोर

  • पुण्यात पाणीकपातीची शक्यता

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांसमोर मोठं पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. वाढत्या उन्हाचा फटका धरणांना बसत आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात वाढत्या उन्हामुळे प्रचंड घट झाली आहे. जर धरणातील पाणीसाठ्यात अशीच घट होत राहिली तर पुण्यात पाणीकपात होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची मागणी एकीकडे दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा कमी होताना पाहायला मिळत आहे. उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झाला आहे . पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातल्या ४ धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी होताना पाहायला मिळत आहे. सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये २६.६१ टक्के म्हणजेच ७.७६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच वेळी हा पाणीसाठा २१ .९५ टक्के म्हणजे ६.४० टीएमसी इतका होता.

सद्यस्थितीला हा पाणीसाठा जास्त जरी असला तरी हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजानुसार यावर्षी एलनीनोमुळे पाऊस कमी प्रमाणात होणार असून त्यामुळे जर पाऊस पडण्यास उशीर झाला तर शहराला पाण्याचा नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नुकतंच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी पाण्याच्या बाबतीत एकदा तरी शहरात कुठलीही पाणी कपात करणार नसून पण पाण्याची कमतरता भास होऊ शकते. त्यामुळे त्याच दृष्टीने नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

पुणे जिल्ह्यातील २६ धरणातील पाणीसाठा किती?

टेमघर - ०.०० टीएमसी

वरसगाव - ३.१६ टीएमसी

पानशेत - ३.५० टीएमसी

खडकवासला - १.१० टीएमसी

पवना - २.६६ टीएमसी

कासारसाई - ०.१७ टीएमसी

कळमोडी - ०.८७ टीएमसी

चासकमान - १.१२ टीएमसी

भामा आसखेड -२.९२ टीएमसी

आंद्रा - १.०९ टीएमसी

वडिवळे - ०.५८ टीएमसी

नाझरे - ०.०७ टीएमसी

गुंजवणी - ०.७६ टीएमसी

भाटघर - २.६३ टीएमसी

निरा देवघर - २.८८ टीएमसी

वीर - ५.२० टीएमसी

पिंपळगाव जोगे - ०.६६ टीएमसी

माणिकडोह - ०.६३ टीएमसी

येडगाव - १.०८ टीएमसी

वडज - ०.४३ टीएमसी

डिंभे - २.०८ टीएमसी

चिल्हेवाडी - ०.५६ टीएमसी

घोड - ०.१९ टीएमसी

विसापूर - ०.१२ टीएमसी

उजनी - ७.६८ टीएमसी

मुळशी - ५.४७ टीएमसी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भात उष्णतेचा प्रचंड कहर; विदर्भातील 3 शहरे 46 पार तर अन्य 3 शहरे 45 पार

नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाख होणार? महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक, CM फडणवीस काय निर्णय घेणार?

economic slowdown : आर्थिक मंदी येणार, कठीण काळ येतोय; राहुल गांधींचा तरुणांसह शेतकऱ्यांना अलर्ट

मोठी बातमी! येवला वन विभागाचे ८ कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; प्रशासकीय विभागात खळबळ

सरकार 'या' वाहनांसाठी आणणार खास FastTag; टोलवर एकही पैसा द्यावा लागणार नाही

SCROLL FOR NEXT