Pune Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुण्यातील तिसरं धरण काठोकाठ भरलं, खडकवासला प्रकल्पात किती टक्के पाणीसाठा?

Kalmodi Dam Overflow: पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणीसाठा असलेले कळमोडी धरण आज पहाटे साडेपाच वाजता १०० टक्के भरले. हे धरण ओव्हरफ्लो झाले असून आरळा नदीमध्ये पाणी जात आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणे (Pune) जिल्ह्यातील तिसरं धरण पूर्णपणे भरले आहे. खेड तालुक्यातील कळमोडी धरण (Kalmodi Dam) आज पाहटे १०० टक्के भरले. हे धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणातून आरळा नदीमध्ये पाणी जात आहे. हे धरण भरल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा पाणी प्रश्न मिटला आहे. तर दुसरीकडे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रातही चांगला पाऊस पडत असून चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणीसाठा असलेले कळमोडी धरण आज पहाटे साडेपाच वाजता १०० टक्के भरले. या धरणातून सुमारे २०० पेक्षा जास्त क्युसेकने पाणी आरळा नदीत सांडव्यावरून खाली पडत असल्याने चास कमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कळमोडी, चासकमान, भामा आसखेड ही तीन धरणे आहेत. यापैकी कळमोडी धरण रविवारी पहाटे साडेपाच वाजता १०० टक्के भरले. पुणे जिल्ह्यातील हे पहिले धरण आहे जे १०० टक्के भरले आहे.

कळमोडी धरण ११ जुलै २०२२ रोजी १०० टक्के भरले होते. तर मागच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये हे धरण १८ जुलै २०२३ रोजी १०० टक्के भरले होते. कळमोडी धरणात २०१० पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाला कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत. धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत जाते.

तर दुसरीकडे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पुढील सहा महिने पुणे शहराची तहान भागेल ऐवढा पाणीसाठा धरणामध्ये जमा झाला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणात मिळून १४.४ टीएमसी पाणीसाठा आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा -

खडकवासला धरण - ७४ टक्के

वरसगाव धरण - ४४ टक्के

पानशेत धरण - ५७ टक्के

टेमघर धरण - ३८ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती युगेंद्र पवार आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT