Pune Dam Water Level Saam tv
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुण्यातील धरणांची पाणी पातळी वाढली का? समोर आली मोठी अपडेट

Pune Dam Water Level Today: चारही धरणांत गेल्या २४ तासांत कोसळलेल्या पावसामुळे १.०४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे

Vishal Gangurde

Pune News: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांतील चारही धरणांत गेल्या २४ तासांत कोसळलेल्या पावसामुळे १.०४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला एक महिना पुरेल इतका आहे. या चारही धरणातील पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Latest Marathi News)

पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या या चार धरणात १०.०९ टीएमसी म्हणजेच ३४.६१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. या चार धरणांमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत ९.०५ टीएमसी पाणीसाठा जमला झाला होता.

मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत १०.०९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे गेल्या २४ तासांत धरणांच्या पाणीसाठ्यात १.०४ टीएमसी पाणीवाढ झाली आहे. पुण्याला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस बरसला. टेमघर धरणक्षेत्रात ७५ मिलिमीटर असा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर वरसगाव धरण परिसरात ४४ मि. मि. पाऊस बरसला. तर पानशेत धरणक्षेत्रात ४८ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात सर्वात कमी ९ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली.

मंगळवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३० मि.मी., वरसगाव धरणांच्या परिसरात २० मि.मी., तर पानशेत धरणक्षेत्रात १६ मि.मी. तर खडकवासला धरणक्षेत्रात ५ मि.मी. पाऊस बरसल्याची माहिती आहे.

धरणांमधील पाणीसाठा

धरण टीएमसी टक्के

टेमघर ०.७ टीएमसी

वरसगाव ४.५१ टीएमसी

पानशेत ३.८९ टीएमसी

खडकवासला ०.९० टीएमसी

कोल्हापुरातील कोयना धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. नवजामध्ये गेल्या 24 तासात 307 मिलीमीटर पाऊस तर कोयनेत 158 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणात प्रति सेंकद 44 हजार 305 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा 32 टीएमसी इतका झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT