Pune Dam Storage 25 July 2023  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी गुड न्यूज, खडकवासला धरण इतके टक्के भरलं; पाणीकपातीचं संकट टळणार?

Pune Dam Storage News Today: पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे, साम टीव्ही

Khadakwasla Dam Storage News Today: पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा (Water Storage) जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.

धरणांमध्ये सोमवारी सायंकाळपर्यंत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.२७ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. दरम्यान, पाणीपातळीत वाढ जरी झाली असली तरी सुद्धा पुणे शहरात लागू असलेली कपात अद्याप मागे घेतली जाणार नाही

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळतेय. पुणे शहरात पावसाने पाठ फिरवली असली, तरी गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे.

गेल्या आठवड्यापासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे.गेल्यावर्षी याचदिवशी चारही धरणांत मिळून एकूण २०.४८ टीएमसी म्हणजे, ७०.२१ टक्के पाणीसाठा होता.

पुणे शहरासाठी खडकवासला धरण साखळीतून ११.६० टीएमसी, समाविष्ट गावासाठी १.७५ टीएमसी, भामाआसखेड धरणातून २.६७ टीएमसी आणि पवना धरणातून ०.३६ टीएमसी पाणी देण्यात येते.आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पात ५९.०३ टक्के म्हणजेच १७.२१ टीएमसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT