संजय गडदे, साम टीव्ही
Mumbai Andheri Landslide: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्वेतील (Andheri Landslide) चकाला परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास बाजूला असलेल्या डोंगरामधून काही भाग रामबाग सोसायटीतील चाळीवर कोसळला. घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत यामध्ये ४ ते ५ घरांचं मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य करत सोसायटीत नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढलं. सध्या या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळत आहे. यामुळं इमारतीच्या 165 घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईसह उपनगरातही सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. सखल भागात पावसाचं पाणी शिरलं असून वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अ
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. यामध्ये सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरातील. तर, शहर भागातील ३६ आणि पूर्व उपनगरातील ६६ इमारतींचा यामध्ये समावेश होता. या सर्व इमारती अतिधोकादायक म्हणजे सी-१ वर्गातील असून त्यातील ९७ इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.